सर्वधर्मीय सदभावना ईद मिलन सम्मेलन 19 एप्रिलला चंद्रपूरमध्ये आयोजन
आपला देश विविध आस्था आणि धारणाचा देश आहे. सांप्रदयिक सदभावना जोपासण्यासाठी सर्व धर्माची माहिती असणे आवश्यक आहे.
त्याच प्रमाणे राष्ट्रीय एकात्मता, बंधुत्व, प्रेम, जातिय सलोखा, वृध्दिगत करण्यासाठी व सामाजिक एकात्मतेचा प्रयत्न म्हणुन या कार्यक्रमाचे आयोजन जमात इस्लामी हिंद शाखा चंद्रपूर कडून करण्यात येत आहे.
प्रा. सैय्यद सलमान सर, पुसद (युवा व्याख्याते व संत साहित्याचे अभ्यासक) हे या संमेलनाचे अध्यक्ष राहणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून संत श्री मनिष भाईजी महाराज (श्री स्वामीनारायण मंदिर, चंद्रपूर)
रेव्ह. अॅन्थोनी अमेर (प्रेस-बिटर-ईनचार्ज संत अंदिया देवालय, चंद्रपूर)
भंते अनिरूध्द थेरो (महाबोधी बुध्द विहार, दुर्गापूर)
ज्ञानी सरवन सिंग राठोड (गुरूद्वारा गुरूनानक दरबार, तुकूम, चंद्रपूर) हे आहे.
हा सम्मेलन शनिवार दि. 19 एप्रिल 2025 सायं. 7.00 वाजता श्रमीक पत्रकार भवन, वरोरा नाका चंद्रपूर येथे आयोजित केला आहे .
अशा सर्वधर्मीय सम्मेलनात जिथे विविध धर्मांचे धर्मगुरु उपस्थित असतील आणि सदभावनेचा मधुर संदेश देतील , तिथे आपणही आपल्या मित्रांसोबत उपस्थित राहावे, अशी विनंती जमात इस्लामी हिंदीच्या शहर प्रमुखांनी केली आहे.