बाबुराव गायकवाड यांची जयंती बालकलाकारांनी केली साजरी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 04/04/2025 7:35 PM



कुपवाड / दि ४,

येथील तमाशासम्राट बाबुराव कुपवाडकर यांची 121 वी जयंती आज बालकलाकारांनी  खुले नाट्यगृहात उत्साहात साजरी केली. स्नेहजित प्रतिष्ठानने या समारंभाचे आयोजन केले होते. 
स्नेहजित प्रतिष्ठानकडे व्यवस्थापन असलेले कुपवाडकर खुले नाट्यगृह सर्व सुविधांयुक्त करण्यासाठी  प्रतिष्ठानचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाकडे वारंवार यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे.  प्रस्तावही दिलेले आहेत, मात्र त्यात कोणतीही प्रगती झाली नाही. या पुढील काळात या ठिकाणी बंदिस्त शेड उभारणीसह सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपाय राबविले जातील, अशी माहिती  प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मती गौंडाजे यांनी यावेळी दिली. सन 2028 -29  मध्ये कुपवाडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांनिमित्त मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक उपक्रम राबवू, असे यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक बालकाने एखादी कला जोपासावी, असे आवाहन अध्यक्ष सन्मती गौंडाजे यांनी यावेळी केले.
यावेळी नाथाजी व्हनकडे, मानतुंग गौंडाजे, तथास्तु गौंडाजे,  संयम गौंडाजे, कलश लोकापुरे, सार्थक नरदेकर, श्लोक नरदेकर, अनय पाटील , गिरीराज जाजू, सुजल सोनी यांच्यासह बालचमू उपस्थित होता. 
सचिव  स्नेहल गौंडाजे यांनी आभार मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या