Saturday 5 April 2025 08:34:02 AM

लोकांसाठी परत मागे वळून येणारे लोकाभिमुख आयुक्त रविकांत आडसूळ

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/03/2025 7:49 AM

भागातील अतिक्रमण विषय होता, गोरगरीब लोकांची घर आणि घरच्या समोर छोट्या स्वरूपात उत्पन्नाला आधार म्हणून भाजी किराणा पान व्यवसाय गिरणी पार्लर असे व्यवसाय घराला आधार देणारी ही माणसं.  या अतिक्रमण कारवाई मध्ये या गरिबांचं लई नुकसान झालं असते. आणि त्यासाठी विना नोटीस महापालिका जेसीबी घेऊन दरवाज्यात आणि मला कॉल आला दादा यायला लागतंय. .लगेच पोचलो. चौकशी केली आणि विनंती केली की मी महापालिकेत आयुकतांशी फक्त चर्चा करतो वेळ द्या असं सांगून अतिक्रमण अधिकाऱ्यांना सांगून वेळ घेतला.

      त्यासाठी विनंती निवेदन तयार केले आणि पन्नास एक माणसं घेऊन महापालिकेत पोचलो.  तत्कालीन अतिरिक्त आयुक्त ज्यांना त्यावेळेचे आयुक्त सुट्टीवर गेल्याने आयुक्त म्हणून प्रभारी चार्ज मिळाला होता त्यामुळे अतिरिक्त आयुक्ताना भेटायचं आहे असं सांगितल्यावर कळलं की अतिरिक्त आयुक्त आताच बाहेर गेलेत मिरजेला जातायत.  अंदाजे गाडी पुष्पराज चौकाच्या आसपास असेल तिथून पुन्हा वापस येऊन निवेदन स्वीकारणारी आणि माझ्याकडे चार दिवस चार्ज आहे मी निश्चित कारवाई थांबवतो म्हणून गोरगरीब लोकांना दिलासा देणारी ती व्यक्ती म्हणजे Ravikant Adsul. रविकांत अडसूळ साहेब ही आपली पहिली भेट कायम आठवणीत राहील.
 
       आता तुम्ही आयुक्त झालात रीतसर आदेश प्राप्त झालेत.  दिलासा आहे समाधान आहे की लोकांसाठी त्यावेळेस माघारी परतलेला माणूस आज आयुक्त झालाय. .खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी सांगली मिरज कुपवाड च्या विकासासाठी मनापासून सदिच्छा...

मा. नगरसेवक,
अभिजीत भोसले

Share

Other News

ताज्या बातम्या