भगूर लहवित रोडवरील श्री इच्छापूर्ती शिवमंदिरात श्री शिवमहापुराण काशीखंड कथेचे आयोजन रुद्राक्ष पुजन,ध्वजारोहण भव्य मंडप भूमिपूजन संपन्न
भगूर वार्ताहर:- नाशिक जिल्ह्यात प्रथमच महाशिवरात्रीनिमित्त भगूर लहवित रोडवरील शिवमंदिरात शेतीनिष्ठ उद्योजक गणेश निसाळ यांच्या संकल्पनेतून श्री इच्छापूर्ती शिवमंदिर समिती व भक्तगणांतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दि.२० फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान श्री शिवमहापुराण(काशीखंड) कथा होणार असल्याचे आयोजक शेतीनिष्ठ उद्योजक गणेश निसाळ यांनी सांगितले.
कथाकार हभप गणेश महाराज करंजकर यांचे ७ दिवस श्रीशिवमहापुराण भाविकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. रोज दुपारी एक ते दोन शिवलीला अमृत पारायण, सायंकाळी साडेचार वाजता रुद्रयाग, भजन तसेच सायंकाळी सहा ते आठ वाजता महाशिवपुराण तसेच दररोज महाप्रसादाचे आयोजन केले आहे. परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून महाशिवपुराण काशीखंड कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. काल येथील श्री इच्छापूर्ती शिव मंदिर परिसरात रुद्राक्ष पुजन,ध्वजारोहण व मंडप भव्य भूमिपूजन सुप्रसिद्ध कथाकार प्रवचनकार कीर्तनकार भगुररत्न रत्न ह.भ.प गणेश महाराज करंजकर,शेतीनीष्ठ उद्योजक शिवभक्त गणेश निसाळ,वृक्षमित्र तानाजी भोर,दिपक बलकवडे,चंद्रकांत गोडसे,रतन कासार, प्रवीण गुळवे,विशाल बलकवडे,प्रेरणा बलकवडे,नितीन करंजकर,चंद्रभान निसाळ,रामदास निसाळ आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रभरातून सदरचे शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी शिवभक्त गण यासाठी येत असतात जागृत देवस्थान म्हणूनही महाराष्ट्रभर या श्री ईच्छापूर्ती शिव मंदिराची ख्याती आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री ईच्छापूर्ती शिवमंदिर समिती यासह विशेष करून श्री ईच्छापूर्ती शिवमंदिर महिला समितीच्या सदस्या प्रयत्नशील होत्या.