*प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडुन हुबळी - बनारस - हुबळी अशी विशेष गाडी सुरु करण्यात आली आहे*
*हि गाडी मिरज मधुन १४ फेब्रुवारी २०२५, २१ फेब्रुवारी २०२५ व २८ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१:३५ वाजता गाडी क्र.०७३८३ हुबळी - बनारस - हुबळी अशी विशेष एक्सप्रेस धावेल. किर्लोस्करवाडी येथुन दुपारी ०२:३०,कराड येथुन दुपारी ३ वाजता व सातारा येथुन दुपारी ०४:०५ वाजता निघेल व प्रयागराज येथे अनुक्रमे १५ फेब्रुवारी २०२५, २२ फेब्रुवारी २०२५ व ०१ मार्च २०२५ रोजी रात्री ०८:३० वाजता पोहचेल.*
*परतीच्या प्रवासासाठी प्रयागराज येथुन १७ फेब्रुवारी २०२५, २४ फेब्रुवारी २०२५ व ०३ मार्च २०२५ रोजी गाडी क्र.०७३८४ सकाळी ०८:५५ वाजता निघेल व मिरज जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ०७:४० वाजता पोहचेल*
*या गाडीस सांगली,किर्लोस्करवाडी, कराड व सातारा या ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे यासाठी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य श्री.गोपाल तिवारी (कराड),श्री. शिवनाथ बियानी (कोल्हापुर) अँड.विनित पाटील (सातारा) यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी झोनमध्ये महाकुंभमेला साठी विशेष गाडीची मागणी करुन गाडी मंजुर करुन घेतली आहे*
*तरी महाकुंभ मेलासाठी जाणाऱ्या भाविकांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे अवाहन रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन चे कार्याध्यक्ष संदिप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,मधुकर साळुंखे,वाय.सी.कुलकर्णी,पंडितराव कराडे (तात्या), श्रीकांत माने,जयगौंड कोरे,पाडुंरंग लोहार यांनी केले आहे.*