आरटी आय न्यूज नेटवर्क
(प्रतिनिधी गोंदवले)
खुडूस दि.माळशिरस तालुक्यातील खुडूस जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाची सुरुवात गावातून प्रभातफेरी काढून करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मकरंद साठे यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अजित साठे, मुख्याध्यापक लावंड सर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अंकुश ठवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सविता गोरवे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव कांबळे, पत्रकार कैलास कांबळे, पत्रकार धनंजय थोरात,ग्रामपंचायत माजी सदस्य आदिनाथ कांबळे, माजी उपसरपंच दादासाहेब साठे, अंकुश धाईंजे, सुरज कांबळे आदी माता, पालक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून शाळेचा विकास कसा होईल, शाळेला भौतिक सुविधा आवश्यक असेल त्या बाबींवर ग्रामपंचायत कडे निधीची मागणी करून शाळेच्या विविध देखभाल दुरुस्ती त्वरित करणार असल्याचे आश्वासन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मकरंद साठे यांनी दिले. शालेय उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता संदर्भात आयोजित सभेत मुख्याध्यापक लावंड सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांनी बलिदान देऊन आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी दिलेले योगदान, संघर्षांबद्दल भाषण विद्यार्थ्यांनी केले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि वेगाने विकसित होणारा देश बनला आहे, मुख्यत्वे शिक्षणातील प्रगतीमुळे. ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणाच्या अधिकाराचे महत्त्व, विद्यार्थ्यांनी अधिक संकरित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत शैक्षणिक प्रणालीसह विकसित भारताची कल्पना केली. पालक विद्यार्थी यांनी कृष्ठरोग निर्मूलन प्रतिज्ञा घेतली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक लावंड सर शिक्षक कुंभार सर,सावळे सर,पाटील मॅडम,अडाणे मॅडम, उबाळे मॅडम, फुले मॅडम, तांबोळी मॅडम, विद्यार्थी माता - पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.