ज्ञान व कौशल्ये आत्मसात होण्यासाठी शिक्षकांची क्षमतावृद्धी निर्मिती तज्ज्ञ सुलभक डॉ. जगदीश पाटील यांनी राज्यस्तरावर दिले प्रशिक्षण

  • Y.D.Dhake (Bhusawal)
  • Upadted: 02/02/2025 6:44 PM


भुसावळ - विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जावे यासाठी शिक्षकांना ज्ञान व कौशल्ये आत्मसात व्हावी याकरिता इयत्ता पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षणासाठी राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणात निर्मिती तज्ज्ञ सुलभक म्हणून डॉ. जगदीश पाटील यांनी प्रशिक्षण दिले. 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षक सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. प्रत्येक मूल शिकले पाहिजे व त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, असे ध्येय जेव्हा ठरवले जाते, तेव्हा त्यासाठी शिक्षकांनी नवनवीन विचार प्रवाह, विषयज्ञान, अध्यापनशास्त्र व विविध धोरणे याविषयी अद्ययावत होणे गरजेचे आहे. त्यानुसार गेल्या वर्षी पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि नववी ते बारावीच्या शिक्षकांसाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यंदा या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा असून यात शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी विविध विषयांवर प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी सुमारे 296 पानांची शिक्षक मार्गदर्शिका, 88 पानांची घटक संच पुस्तिका आणि विषयनिहाय पीपीटी तयार करण्यात आल्या आहेत. या पुस्तिकांच्या निर्मितीत जळगाव जिल्ह्यातून डॉ. जगदीश पाटील व प्रमोद आठवले यांचा सहभाग होता. त्यामुळे पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षणात निर्मिती तज्ज्ञ सुलभक म्हणून दोघांनी प्रशिक्षकाची भूमिका पार पडली. प्रशिक्षणात राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी शिक्षक सहभागी झाले होते. हे प्रशिक्षणार्थी आपापल्या जिल्हास्तरावर आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात सुलभक म्हणून काम करणार आहेत.
शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा - पायाभूत स्तर व शालेय शिक्षण, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, मूल्यांकन संकल्पना, मूल्यांकन कार्यनीती, प्रश्नप्रकार, प्रश्ननिर्मिती कौशल्ये, विचारप्रवर्तक प्रश्न, अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्ननिर्मिती आणि समग्र प्रगतिपत्रक अशा नावीन्यपूर्ण विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे
जळगाव जिल्हास्तरावर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण दि. 3 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. जळगाव येथील इकरा महाविद्यालयात व रायसोनी जुनिअर कॉलेज येथे हे प्रशिक्षण पार पडणार आहे. प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, जिल्हा समन्वयक डॉ. चंद्रकांत साळुंखे यांच्यासह डायटचे अधिकारी आणि जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विभाग परिश्रम घेत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या