*श्री एकनाथराव सहादू शेटे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर समारोप कार्यक्रम साकुर येथे संपन्न.*

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 04/02/2025 2:44 PM

*श्री एकनाथराव सहादू शेटे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर समारोप कार्यक्रम साकुर येथे संपन्न.*


श्री एकनाथराव सहादु शेटे कला,वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प, नाशिक.आयोजित राष्ट्रीय सेवा योजना NSS शिबीर समारोप कार्यक्रम  साकुर गाव तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.. या कार्यक्रम प्रसंगी शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्याध्यक्ष मा. एकनाथराव सहादु शेटे, पुणे विद्यापीठाचे सिनेट मेंबर मा. संजय नरहरी कीर्तने, शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या मा. हेमांगी शशिकांत पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य उद्योजिका मा.निवेदिता अनंतराव अथणी, ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी, ग्रामस्थ मंडळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. आलेल्या सर्व मान्यवरांचे महाविद्यालयातील गीतमंचाने स्वागत गीताने स्वागत केले. महाविद्यालयांचे प्रा. डॉ.मृत्युंजय दिनेश कापसे यांनी आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार केला. साकुर येथे गावकऱ्यांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक एनएसएस कॅम्प मध्ये आलेले सर्व विद्यार्थी, एनएसएस कार्यक्रमाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य या सर्वांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.या कार्यक्रमाचे व अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष मा.एकनाथराव सहादू शेटे हे होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधत महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. मृत्युंजय दिनेश कापसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शिक्षण मंडळ भगूर संस्थेच्या सदस्या मा. हेमांगी ताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच पुणे विद्यापीठाचे सिनेट मेंबर मा.संजय कीर्तने यांनी विद्यार्थ्यांना गाडगेबाबांच्या कार्याची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले.
तसेच एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ .अमलेश भोंगाडे यांनीही आपल्या मनोगतात संपूर्ण सात दिवसीय कॅम्पमध्ये जे उपक्रम घेतले त्याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच गावकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली असे देखील ते आपल्या मनोगत बोलले. सात दिवसीय शिबिरा दरम्यान अनेक मान्यवरांनी शिबिरास भेटी दिल्या व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले त्यामध्ये पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर मा.सागरजी वैद्य यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले.विद्यार्थी मनोगतात अनुष्का जाधव, नयन मुठाळ, श्वेता वाघ, या विद्यार्थिनींनी आपल्या सात दिवसीय कॅम्पचा अनुभव सर्वांसमोर मांडला त्यामध्ये बोलताना विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल गावकऱ्यांना धन्यवाद दिले. मा.हेमंत भामरे पोलीस उपनिरीक्षक वाडीवऱ्हे यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये जि.प. शाळा साकुर येथील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील एनएसएस कॅम्प मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांची त्यांच्याकडून तयारी करून घेतली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नाटिका,नृत्य, पथनाट्य सादरीकरण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान सानप आणि आभार प्रदर्शन प्रा. रोहिणी जगताप यांनी केले.या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व  विद्यार्थिनी, प्राध्यापकेतर कर्मचारी , साकुर गावचे ग्रामस्थ यांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

Share

Other News

ताज्या बातम्या