*जळव ते बामणेवाडी रस्ता कामाचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन*

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 04/02/2025 6:34 AM


 आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

सातारा दि.२ मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या योजनेमधून मंजूर टीआर १७ ते सीपीआर ७ जळव ते बामणेवाडी या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले.

जळव ते बामणेवाडी या काँक्रिटीकरण रस्ता कामाचे भूमिपूजन जळवफाटा येथे
पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच रामचंद्र पवार , विश्वास पवार , विजयराव सपकाळ,  इंजिनियर कांबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, जळव ते बामणेवाडी या रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दहा कोटी 17 लाखाची असून तांत्रिक मंजुरी आठ कोटी पंधरा लाखाची मिळाली आहे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दहा वर्षात 47 लाख 64 हजार रुपये लागणार आहेत. या अनेक वर्षे मागणी होत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना चांगली सुविधा निर्माण होणार आहे. सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच कामाचा दर्जा चांगला राखावा अशी सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या