वणी - राज्यातील जनतेच्या घरी घरगुती विद्युत मिटर व्यवस्थित सुरु असतांना भांडवली कंपनीला खुश करण्यासाठी जुने मिटर काढुन स्माॅर्ट मिटर लावण्याचे धोरण विज वितरण कंपणीने सुरु केले आहे.या धोरणाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कडाडुन विरोध केला आहे.या अनुषंगाने भाकपने म.रा.विज वितरण कंपनीच्या वणी व झरी येथील मुख्य अभियंता यांना निवेदन सादर केले.निवेदनात स्मॉर्ट मिटर लावण्याचे धोरण बंद करावे,सन 2020-21 पासुन शेती पंपाच्या विज पुरवठ्याकरिता डिमांड भरलेल्या शेतकरयांना विजेचे कनेक्शन विनाअट तात्काळ द्या,शेतीसाठी सौरउर्जा कनेक्शनची सक्ती करू नये ती ऐच्छीक करावी या मागण्याचा समावेश आहे.या मागण्या मान्य न केल्यास जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये व विज वितरण कार्यालयावर भाकपचे वतीने प्रचंड मोर्चे काढण्याचा ईशारा म.रा.किसान सभेचे राज्य कौंसिलर कॉ.अनिल हेपट यांनी दिला.निवेदन सादर करतेवेळी कॉ.अनिल हेपट,अनिल घाटे,वासुदेव गोहणे,पांडुरंग ठावरी,राजु पेंदोर,अथर्व निवडींग,राकेश खामणकर,चंदु निकुरे,हरिच्छंद्र पुनवटकर उपस्थित होते.