*शेळकेवाडी शिवारामध्ये खडी क्रेशर प्रकल्प होणार आहे याबाबत गावाला कोणतीही कल्पना नाही किंवा सूचना दिली नाही परंतु मासिक मीटिंगमध्ये ठराव करून संबंधित खडी क्रेशर मालकाला प्रमाणपत्र देण्यात आले ते प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. आज सोमवार दिनांक३ फेब्रुवारी२०२५ रोजी शेळकेवाडी येथे ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. यापुढे मासिक मीटिंगमध्ये किंवा मनमानी करून पदाधिकाऱ्यांनी लेटर पॅड वरती प्रमाणपत्र देऊ नये ,तसेच कोणत्याही उद्योग व्यवसायाला प्रमाणपत्र द्यावयाचे असेल तर ग्रामसभा बोलवून गावातील लोकांना सूचना करून ठराव करूनच प्रमाणपत्र देण्यात यावी. असा ठराव घेण्यात आला. जलजिवन मशीन चे काम गेले तीन वर्षापासून रखडले आहे काही शेतकरी व वैयक्तिक प्लॉट धारक यांनी ते काम अडवले आहे, आणि न्यायालयीन लढा चालू आहे परंतु जेंव्हा सर्वे झाला तेव्हा तो चुकीचा झाला, गावाच्या आसपास विहिरीतून पाईपलाईन आली परंतु गावाजवळ आल्यानंतर मुख्य रस्त्यालगतुन घेऊन रस्त्यालगदतूनच पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाईप लाईन जाऊ शकते, म्हणून मुख्य रस्त्यालगतच पाईपलाईन घेऊन वाढीव कामाची तरतूद करून तो प्रश्न मिटवण्यात यावा व संबंधितांना तसे सूचना करण्यात यावी, हा ही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच विविध कामावर विविध समस्यावर चर्चा करण्यात आली. सदर ठराव जयहिंद गुंठेवारी सेनेचे नेते मा. रामदास सावंत यांनी मांडला, खडी क्रेशर प्रकल्प शेळकेवाडी शिवारामध्ये झाल्यास जनजीवन विस्कळीत होणार आहे धुळीचे साम्राज्य होणार आहे, जन माणसाचे आरोग्य धोक्यात येणार आहे, शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार आहे, लहान थोरापासून सर्वांच्या आरोग्यास धोका होणार आहे, रस्त्याची नासधूस होणार आहे, असे विविध मुद्दे मा. रामदास सावंत यांनी मांडले, म्हणून शेळकेवाडी शिवारामध्ये खडी क्रेशर प्रकल्प होऊ नये असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.