सन्मान *ती* चा सन्मान *पूर्णागिनींचा*
विधवा हा अपमानास्पद शब्द न वापरता *ती* चा उल्लेख हा *एकल* अथवा *पूर्णागिनीं* असा व्हावा- प्रेरणा बलकवडे
*राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे* यांच्या संकल्पनेतून भगूर येथे *सन्मान “ती” चा* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुवासिनींसोबत पूर्णागिनी भगिनी ना ही समानतेच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी हा *हळदी कुंकू* चा कार्यक्रम घेण्यात आला .राष्ट्रवादी महिला काँग्रेस व झेप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रमाचे दुसरे वर्ष आहे.
महिला सन्मानार्थ समाजातील सर्व महिलेला समान वागणुक देण्यात यावी काही कारणास्तव ती च्या आयुष्यात ती च्या पतीचे निधन झाले असता ती ला *विधवा* म्हणून सम्भोधले जाते तीला शुभकार्यास पुढे न येऊ देणे कुठलेली कार्य असो अथवा इतर बऱ्याच ठिकाणी ती ला टाळल्या जाते आशा स्त्रियांना समाजच्या प्रवाहात आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. यात त्या विखुरलेल्या विचारांला मोडकळीस आणून त्या महिलेला विधवा न म्हणता *ती* चा उल्लेख हा *एकल* अथवा *पूर्णागिनीं* असा व्हावा आणि त्यांचा ही सुवासिनी जैसा च सन्मान व्हावा असे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले.
भगूर शहरात संक्रांतीच्या औचित्य साधून हळदी कुंकू या कार्यक्रमाचे खास ती च्या साठी आयोजन करण्यात आले . भगूर शहरात कोणत्याही स्त्रीचा पती गेल्यावर तीचे कुंकू पुसले जाणार नाही, बांगडी, जोडवी मंगळसुत्र उतरवले जाणार नाही हा निर्धार भगूर शहरातील सर्व महिलांनी एकत्रीत शपत घेऊन केला. याची सुरुवात पुर्णांगिनींना व्यासपिठावर कुंकू लावून केली.
हाळदी-कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी विविध खेळ सेलिब्रीटी एव्कर आदित्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. महिलांनी धम्मलाल करत खेळांचा आनंद लुटला व नविन विचारांचे वाण घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पडला.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, प्रेमलता राजगुरु, योगिता चव्हान, सायरा शेख, भोर, वर्षा लिंगायत, भारती बलकवडे, शितल बलकवडे, सुरेखा निमसे, रोहिनी बलकवडे, भारती साळवे, जिजाबाई जाधव, हर्षदा सुर्वे, निशा पुजारी,आदिंसह असंख्य महिला उपस्थित होत्या.