महाराष्ट्र राज्य दिशा समितिवर खा. विशाल पाटील यांची निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/02/2025 10:37 PM

सांगली:- केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यात सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा.विशाल दादा पाटील  यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत सर्वपक्षीय लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्यांचा समावेश आहे. यानिमित्ताने मा. विशाल दादा पाटील यांना केंद्र शासनाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे...!
या समितीत खासदार छ. उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहू छत्रपती, विशाल दादा पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, प्रफुल पटेल, रामदास आठवले, सुनील तटकरे, डॉ.भागवत कराड, श्रीरंग बारणे या दहा जणांचा समावेश आहे... केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मधील यंत्रणा समन्वय राखण्याचे काम या समितीमार्फत केली जाईल. या आधीची समिती सन 2019 नियुक्त करण्यात आली होती बरखास्त करून ही नवीन समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आले आहे...!

Share

Other News

ताज्या बातम्या