कुपवाडबरोबर सर्वच प्रभागात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी, सर्वसामान्यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/01/2025 11:24 AM


 *सर्वच प्रथम कुपवाड विभाग चे स.आयुक्त सचिन सावगावे साहेब व स्वछता निरीक्षक यांचे मनःपूर्वक आभार अभिनंदन...
 कुपवाड विभाग अंतर्गत जो तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे हा एक चांगला व लोका भिमुक महत्वकांक्षी निर्णय आहे त्याचे नागरिक म्हणून स्वागत आणि अभिनंदन...
      मा. उपायुक्त कुपवाड आणि स्वछता निरीक्षक आपण पारदर्शक आणि लोका भिमुक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहात त्यासाठी नागरिक म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत ह्या करिता आपण फक्त स्वच्छता निरीक्षक ठोकळे साहेब यांचे वार्ड पुरता तक्रार निवारण कक्ष स्थापन न करता कुपवाड बरोबर सर्वच प्रभागात वार्ड मध्ये सुरू करून प्रत्येक वार्ड मध्ये असणारे सफाई कर्मचारी हजेरी शेड वरती नागरिकांच्या तक्रारी,समस्या,NOC व इतर सोई सुविधा करिता तक्रार वर्दी रजिस्टर, सफाई कर्मचारी हलचाल रजिस्टर, ठेवावे जेणे करून प्रत्येक वेळी नगरसेवक ला तक्रार सांगणे आणि नगरसेवक आयुक्त पर्यंत तक्रार करणार आणि आयुक्त साहेब स्वछता निरीक्षक याना कळणार इतकी डोकेदुखी करण्यापेक्षा सकाळी 6 ते 2 हजेरी शेड वरती बसत व वार्ड फिरती स्वछता निरीक्षक करत नाहीत त्यांना बसवणे आवश्यक आहे जेणे करून प्रत्येक वार्ड मधील तक्रारीचा निपटारा करणे अधिक सोपे व सोईचे होईल. कृपया कुपवाड चे सिंगम उप आयुक्त सचिन सावगावे साहेब आपण ह्यासाठी आदेशाची अमलबजावणी कराल अशी नागरिक म्हणून विनंती करत आहे ती अवलोकण्यात यावे ही* विनंती 


*आपला कुपवाडकर नागरिक*

Share

Other News

ताज्या बातम्या