आर्मी इलेवन आणी ए. जी. नागपुर मध्ये अंतिम लढत तिसऱ्या पारितोषिकासाठी बीएसएफ आणी साईं एक्सेलेंसी लढणार

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 05/01/2025 6:37 PM

नांदेड :- एकवनव्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड आणी सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट अंतर्गत खेळण्यात असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यश मिळवत आर्मी इलेवन जालंधर संघ आणी ए. जी. नागपुर संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर बीएसएफ जालंधर आणी साईं एक्सेलेंसी संभाजीनगर संघाना तिसऱ्या स्थानासाठी संघर्ष करावा लागणार आहे. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता सुमारास खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम मैदानावर अंतिम सामना खेळण्यात येईल अशी माहिती स्पर्धा आयोजन समिती प्रमुख स. गुरमीतसिंघ नवाब यांनी येथे दिली. 
आज दुपारी एक वाजता उपांत्य फेरीचा पहिला सामना आर्मी इलेवन जालंधर आणी बीएसएफ जालंधर संघात खेळला गेला. या सामन्यात आर्मी इलेवन संघाने 3 विरुद्ध 1 गोल अंतराने बीएसएफ जालंधर संघावर विजय मिळवला. आर्मी इलेवन संघातर्फे आलीशान मोहम्मद याने 11 व्या मिनिटाला, समीर मिंज याने 13 व्या मिनिटाला गोल करुन सामन्यात पकड मिळवली. त्यानंतर रमनदीपसिंघ याने 35 मिनिटाला मैदानी गोल करत आघाडी वाढविली. बीएसएफ संघाने अनेक संधी गमावल्या मुळे त्यांना खेळात परत येता आले नाही. खेळाच्या शेवटी 55 व्या मिनिटाला बीएसएफ संघाला पेनल्टी स्ट्रोक मिळाले आणी कमलजीतसिंघ याने त्याचा लाभ मिळवत संघासाठी एकमेव गोल केला. आर्मी संघ विजयी ठरला.
आज दुपारी 3 वाजता सुमारास खेळण्यात आलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ए. जी. नागपुर संघाने साई एक्सेलेंसी संभाजीनगर संघास 2 विरुद्ध 0 गोल अंतराने मात करीत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अती संघर्षपूर्ण अशा या सामन्यात नागपुर संघातर्फे 44 मिनिट आणी 55 व्या मिनिटाला गोल करण्यात आले. नागपुरच्या तिरसकुमार याने अपेक्षानुसार आजपन मैदानी गोल केला. तर पाठोपाठ रविनीश जायसवाल ने देखील मैदानी गोल केला. 
........

बक्षिस वितरण : 
51 व्या श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेच्या पारितोषिकाचे वितरण विधान परिषदेचे शिवसेना गट नेते मा. श्री हेमंत पाटिल यांच्या शुभास्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर पालिकेचे आयुक्त मा. श्री महेशकुमार डोईफोडे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार मा. श्री आनंदराव तिडके पाटिल, भाजपा जिल्हा अध्यक्ष मा. श्री संतुकराव हंबर्डे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. श्री चैतन्यबापु देशमुख उपस्थित राहतील. यावेळी क्रीडाप्रेमिनी उपस्थित राहावे असे आवाहन गुरमीतसिंघ बरियामसिंघ नवाब यांनी केले आहे. 
.......
पारितोषिक : 
प्रथम विजेता संघास रोख एक लाख रूपये आणी फिरते चषक देण्यात येईल. तर उपविजयता संघास रोख 51 हजार आणी फिरते चांदीचे चषक देण्यात येईल. तर तिसऱ्या स्थानावर येणाऱ्या संघास रोख 11 हजार आणी स्मृतिचषक देण्यात येणार आहे. तर व्यक्तिक स्वरुपाचे पारितोषिक देखील देण्यात येणार आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या