परतवाडा : अकरावी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप अबॅकस व वैदिक मॅथ कॉम्पिटिशन 2024, 22 डिसेंबर ला अमरावती येथील बिर्ला ओपन माईंड इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडली यामध्ये जवळपास 700 विद्यार्थी पूर्ण भारतातून सहभागी होते. या कॉम्पिटिशनमध्ये परतवाड्यातील तीन विद्यार्थी ग्रँडमास्टर मध्ये ओजल नितीन गणोरकर ,वेद प्रवीण ढोमणे, नमन आशिष भांडे, यांचा समावेश आहे तसेच फस्ट रंक यामध्ये निधी नितीन गणोरकर, ओवीयोगेश धुमाळे यांचा समावेश आहे तसेच सेकंड रंक मध्ये शौनक विनीत गुप्ता, शौर्य योगेश धुमाळे व प्रोत्साहन पर पारितोषिक मध्ये लुबदा प्रवीण वाढवे, सानिध्य नीरज गुप्ता, श्रेयस निशिकांत कुथे, अर्णव धीरज गुप्ता, अर्णव दीपक कोल्हे, तनय प्रवीण वाढवे व तन्मय परमान भुसुम यांनी चांगल्या पद्धतीने अबॅकस मध्ये चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. जीनियस स्टडी सर्कल अबॅकस सेंटर परतवाडा ची संचालिका कु.स्वाती महादेवराव गणोरकर यांच्या परिश्रमामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ह्या सर्व विद्यार्थ्यांना यश प्राप्त झालेले आहे. करिता सर्व विद्यार्थी व त्यांची मार्गदर्शक शिक्षिका यांचे अभिनंदन.