सांगली,मिरज,कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने अवाजवी मनमानी पद्धतीने आकारण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कराच्या निषेधार्थ सोसायटी चौक,कुपवाड येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या मालमत्ता कर वाढीच्या निषेधार्थ कुपवाड मध्ये पहिल्याच आंदोलनाची ठिणगी पडली.याची मनपा प्रशासन प्रशासक/मालक यांनी नोंद घ्यावी.व वाढीव मालमत्ता कर आकारणी रद्द करावी,अन्यथा सांगली, मिरज,कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात याचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही.
सदर रास्ता रोको आंदोलनात कुपवाड मधील सर्व लोकप्रतिनिधी,व्यापारी,रहिवाशी नागरिक,बंधू,भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठींबा दिला.
उपस्थित सर्वांचे मनापासून आभार...