हॉकी स्पर्धेत आर्मी इलेवन जालंधर हॉकी संघ सर्वप्रथम नागपुरला दूसरे तर बीएसएफ संघाला तीसरेस्थान

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 06/01/2025 8:02 PM

नांदेड : मागील आठ दिवसापासून सुरु असलेल्या श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेत आर्मी इलेवन जालंधर संघाने प्रथम विजयता पारितोषिक पटकावला. आर्मी इलेवन संघाने टायब्रेकर मध्ये अंतिम सामना ए. जी. नागपुरला मात देत 3 विरुद्ध 2 गोल अंतराने जिंकला. नागपुर संघाने उपविजेता पद तर तीसरे पारितोषिक बीएसएफ जालंधर संघाने पटकावला. 
सोमवारी सकाळी आर्मी इलेवन जालंधर आणी ए. जी. नागपुर संघादरम्यान अंतिम सामना खेळला गेला. नागपुर संघाने आक्रमक सुरुवात करतांना खेळाच्या 8 व्या मिनिटाला अमीदखान पठान यांनी केलेल्या मैदानी गोलाच्या मदतीने आघाडी निर्माण केली होती. पण आर्मी संघाच्या शिवा कुमार शिवांगी याने खेळाच्या 14 व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीवर आणला. दोन्ही संघानी परस्परावर गोल करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आणी आर्मी संघाने 57 व्या मिनिटास मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोल मध्ये करत आघाडी घेतली. तेच दोन मिनिटानंतर नागपुरच्या तिरसकुमारने मैदानी गोल करत बरोबरी साधली. निर्धारित वेळ संपल्यामुळे ट्राय ब्रेकरच्या मदतीने निष्कर्ष काढण्यात आले. यात आर्मी इलेवन संघाने 3 विरुद्ध 2 गोल अंतराने अंतिम सामना जिंकला. तसेच ट्रॉफीही मिळवली. 
आज तिसऱ्या स्थानासाठी बीएसएफ जालंधर आणी साईं एक्सेलेंसी संभाजीनगर यांच्यात सामना खेळविला गेला. बीएसएफ जालंधर संघाने हा सामना 4 विरुद्ध 0 गोल अंतराने जिंकला. 
....

हॉकी मैदानासाठी जागा द्या, टर्फसाठी 50 लाख देतो : हेमंत पाटिल 
51 व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी हॉकी टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यानंतर प्रथम विजेता संघ, उपविजेता संघ आणी तृतीय स्थान पटकावणाऱ्या संघांना विधान परिषदे गटनेता शिवसेना शिंदे गट आमदार श्री हेमंत पाटिल यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे आयुक्त श्री महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार श्री आनंदराव तिडके पाटिल बोंढारकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री चैतन्यबापु देशमुख, भाजपा महानगर अध्यक्ष श्री प्रवीण साले, उपायुक्त अजितपालसिंघ संधु, श्री बाळू खोमने, गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक राजदेविंदरसिंघ कल्ला, दर्शनसिंघ सिद्धू, अमितसिंह तेहरा, गुरचरनसिंघ घडीसाज, दीपसिंघ फौजी, सुखविंदरसिंघ हुंदल, लड्डूसिंघ काटगर, भागिंदरसिंघ घडीसाज, जोगिंदरसिंघ खैरा इत्यादि उपस्थित होते. 
दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळाचे अध्यक्ष स. गुरमीतसिंघ नवाब यांनी अथितिचे सत्कार केले. यावेळेस आपल्या भाषणात आमदार हेमंत पाटिल म्हणाले, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या नावाने येथे वर्षानुवर्षे हॉकी स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यामुळे खेळाला आणी खेळाडूंना पोषक असा वातावरण उपलब्ध होतो. गुरुद्वारा बोर्ड, लंगरसाहेब आणी महानगर पालिकेच्या सहकार्याने वरील स्पर्धा पार पडतात. गुरुद्वारा आणी येथील संत मंडळी एकाप्रकारे नांदेड शहराचे पालकच आहेत. अनेक उपक्रमाना त्यांच्या वतीने सहकार्य करण्यात येते.
हेमंत पाटिल पुढे म्हणाले, पुर्वी ह्या स्पर्धा वजीराबाद येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर खेळली जायायची आणि मोठा प्रेषक वर्ग त्याठिकाणी खेळाचा आनंद घेत असे. पण आता तो मैदान खूप लहान झाला आहे. त्याठिकाणी स्पर्धा घेणे शक्य राहिले नाही. आज शहरात इतत्र कुठे खेळण्यासाठी मैदानं उपलब्ध नाहीत, त्यामुळे खेळाडूंची मोठी कुंचबना होत आहे. नांदेड मध्ये हॉकी खेळास चांगले वाव आहे आणी आधुनिक प्रणालीचे हॉकी मैदान तयार करण्यासाठी चार ते पाच एकर जागेची गरज आहे. जर ही जागा उपलब्ध करता आली तर मी आस्सो टर्फसाठी 50 लाख रूपये देण्यास तयार आहे. 
हेमंत पाटिल यांनी त्यांच्यावतीने प्रथम विजेता संघ आर्मी इलेवन संघास पन्नास हजारचे रोख बक्षिस दिले. तर त्यांच्या आग्रहामुळे स. दीपसिंघ फौजी यांनी नागपुर संघास रोख 25 हजार दिले तर स. भागिंदरसिंघ घडीसाज यांनी बीएसएफ जालंधर संघास रोख आकरा हजार रूपये बक्शीस म्हणून दिले. पुढील वर्षी बक्षिस रक्कमेत वाढ करण्यात यावी असे ही हेमंत पाटिल यांनी सूचवीले. आठ दिवस सतत चाललेल्या स्पर्धा संचालित करण्यासाठी जीतेन्द्रसिंघ खैरा, हरविंदरसिंघ कपूर, कोषाध्यक्ष हरप्रीतसिंघ लांगरी, सहसचिव संदीपसिंघ अखबारवाले, सदस्य महिन्दरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलों, महिंदर सिंघ गाडीवाले, अमरदीपसिंघ महाजन, विजय नंदे, जुझारसिंघ सिलेदार, खेमसिंघ पुजारी, नरिंदर सिंघ यांनी परिश्रम घेतले. येथील विविध सामन्यात राजकुमार झा, गुरप्रीतसिंघ, रतिन्दरसिंघ बरार, सिद्धार्थ गौर, करणदीपसिंघ, अश्विनीकुमार, गुरमीतसिंघ, राहूल राज, गुरतेजसिंघ, प्रिंससिंघ, विजयप्रकाश मंगलूरकर यांनी पंच म्हणून कामगिरी पाहिली.

Share

Other News

ताज्या बातम्या