टाकावू पासून टिकाऊ... सा मि कु मनपाचा हटके प्रयोग

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/01/2025 8:50 PM

    सांगली मिरज कुपवाड मनपा प्रभाग समिती क्रमांक चार वार्ड क्रमांक पाच,मिरज मधील शास्त्री चौक ते वांडरे ट्रेडर्स पर्यत काही बेजबाबदार नागरिकांच्या चुकीच्या वागण्याने,,, रोज रस्त्यावर कचऱ्याचे ढीग चे ढीग साचत होते,,,, सदर विषयी शिवसेना शिंदे गटाचे मिरज शहर उप शहर प्रमुख सादिक पठाण ह्यांनि वारंवार निवेदन दिले आंदोलन केले,,, सतत पाठपुरावा करून सदर रस्ता कचरा मुक्त होण्यासाठी लढा दिला,, त्याआंदोलनाला कुठे तरी यश आले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही,,, प्रभागातील नागरिक ज्यावेळी गुलाबी थन्डीत गाढ झोपेत होते, त्यावेळी आरोग्य विभागाच्या टीम ने 3/1/2025 रोजी एक रात्री तो कचऱ्याचा पॉईंट गायब केला, आणि त्या ठिकाणी टाकवू वस्तू जुने टायर काठ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या पासून सुशोभिकरण करून सेल्फी पॉईंट तयार केला,,, वार्ड पाच मध्ये नव्याने बदली होऊन स्वछता निरीक्षक सचिन वाघमोडे ह्यांनी,,, सदर कामगिरी पार पाडली,,, सदर रस्ता कचरा मुक्त केल्याबद्दल आज शिवसेना शिंदे गटाचे उप शहर प्रमुख सादिक पठाण व भारतीय जनता पार्टीच्या...पंचायत राज, सांगली मिरज कुपवाड उप अध्यक्ष,सुनीता वांडरे ह्यांनी सांगली  मनपा आयुक्त शुभम गुप्ता साहेब आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे साहेब सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला साहेब ह्यांचे आभार मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या