निर्मलकुमार सूर्यवंशी यांना दर्पण साहित्य पुरस्कार प्रदान

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 06/01/2025 5:39 PM

नांदेड : -महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने दिला जाणारा साहित्य दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ प्रकाशक व लेखक निर्मलकुमार सूर्यवंशी यांना आज पत्रकार दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले या गावी ज्येष्ठ पत्रकार तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र,ग्रंथ आणि रूपये अकरा हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत सुभाष भुमे, मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. जगदीश कदम, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके , पोंभुर्ले गावच्या सरपंच प्रियांका धावडे ,उपसरपंच सादिक डोंगरकर यांची उपस्थिती होती.
गतवर्षी पोंभुर्ले गाव पुस्तकांचे गाव करावयाची घोषणा करण्यात आली होती.त्याला निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी प्रतिसाद देऊन एकशे एक पुस्तकांची भेट दिली .
आरंभी रवींद्र बेडकिहाळ यांनी प्रास्ताविक केले.विजय मांडके यांनी सूत्रसंचालन तर कृष्णा शेवडीकर यांनी आभार मानले.
याप्रसंगी श्रीकांत साबळे-पुणे,दीपक शिंदे -सातारा,नवनाथ कुथाळ-अहिल्यानगर, विमलताई नलवडे -सातारा आदी पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ.कदम आणि भुमे यांनी आपले विचार मांडले.
लेखिका अलका बेडकिहाळ , ज्येष्ठ अनुवादक भीमराव राऊत,अमर शेंडे, रोहीत वाकडे, गजानन पारखे तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले लेखक,पत्रकार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या