कचऱ्याचे झाले सोने, देवराई मुळे कचरा डेपोचे रुपडेच बदलले

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/01/2025 12:44 PM

-  कचरा मुक्त शहर करण्यास प्रशासन बरोबर नागरिकांचा ही सहभाग असणारच आहे.  नागरिक हे शहराच्या चांगल्या   बद्दलाचे शिल्पकार असतात ,यावर माझा विश्वास   आहे,  तो खरा ठरणार -मा शुभम गुप्ता आयुक्त 

 -भविष्यात देवराई   हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याकडे लक्ष केंद्रित करणार -मा शुभम गुप्ता (आयुक्त भाप्रसे)

सांगली बेडग वडी रोड व समडोळी रोड अनेक वर्षापासून  कचऱ्याचा डोंगर ,दुर्गंधी, डोळ्याला वंगाळ वाटणारा परिसर  आज कायापालट होऊन सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेत आहे ही किमया नव्हे तर हे होते सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा मनापासून केलेला प्रयत्नाचे फळ .
होय आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी या कचऱ्याबाबत अनेक तीव्र आंदोलने मोर्चे जन आंदोलने करून आगडोम उसळलेला  होता .आज याच गावातील लोक प्रशासनाचा अजोड कामगिरीचे  तोंड भरून कौतुक करून मानसन्मान देऊन हे केलेल्या  *मेकओव्हर* बद्दल धन्यवाद देत आहेत .
कधीकाळी हा कचराचा डोंगर पाहून नाक मुरडणारे आज सजीव देवराई पाहून मनोमनी आनंदित होत आहे.

सफाई कामगार ते प्रशासन प्रमुख या सर्वांनी केलेले मनापासून चे प्रयत्न होते
 हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक जणांच्या हात लागले आहेत  सफाई कामगार ते कुटुंब प्रमुख  आयुक्त म्हणून यांनी मनापासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत .यामध्ये तात्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी सुरुवात करून मा  सुनील पवार यांनी देखील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चांगले काम केले आहे.
बेडग रोड कचरा डेपो येथे जून कचरा - ३,१३,८२१ mt
समडोली रोड  येथील कचरा डेपो वरील ६,६५,२८४ mt
एकूण ९,७९,१०५ mt जून कचरा मुक्त परिसर    झाला आहे .

 आता जबाबदारी मोठी आणि महत्वाची समजून मा शुभम गुप्ता आयुक्त भा प्र से  यांनी  कचरा मुक्त झालेल्या जागा त्या वर  दैनंदिन गोळा होणारा कचरा वर प्रक्रिया करण्या करिता नवीन  प्रकल्प उभा करण्या साठी प्रयन्त चालु केले  वेळेत कार्यरत होईल असे नियोजन देखील केले आहे.
 टाइम्बॉण्ड प्रोग्रॅम निश्चित करून काम चालू केले आहे, यश नक्की येणार पण साथ नागरिकांची असावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. 

 नागरिकांनी आपला कचरा हा दोन भागात ओला आणि सुखा देणे इतकेच काम असणार आहे, त्या नंतर प्रशासन आपले  पुढील कामकाज करणार आहेत.
 जुन २०२४ पासून प्रकल्प  कार्यरत होऊन दैनंदिन कचरा देखील मार्गी लागणार आहे .

 बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प.
तसेच मृत जनावर क्रेमेटर, डॉग पाँड, वीड तो वेल्थ, असे विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत असून कचरा मुक्त शहर म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका नावारूपाला येणार आहे. त्यास साथ असणार आहे ती सर्व सांगली मिरज आणि कुपवाड मधील सुज्ञ नागरिकाची...

Share

Other News

ताज्या बातम्या