नांदेड :- प्रादेशिक परिवहन विभागामार्फत 10 जानेवारीपर्यत शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. तरी सर्व स्कूलबस चालक, मालक यांनी त्यांच्या वाहनाचे सर्व वैध कागदपत्रे वाहनासोबत ठेवावी. तसेच वाहन तांत्रिकदृष्टया दोषमुक्त व सुस्थितीत ठेवावेत. तसेच वाहनाचे कागदपत्रे वैध नसल्यास सर्व कागदपत्रे वैध करुन घ्यावीत. या तपासणी मोहिमेत दोष आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थी वाहतुक करणारी वाहने या वाहनांची तपासणी मोहीम राबवितांना सर्व पालकांनी शालेय प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. सदर वाहनांद्वारे वाहतुक करतांना विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची सर्व वाहनधारक, चालक व पालकांनी दक्षता घ्यावी . तसेच शाळेचे मुख्याध्यापक हे शालेय स्कुलबस परिवहन समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी त्यांच्या अखत्यारितील स्कूल बसमधून नियमानुसार विद्यार्थी वाहतुक करावी असेही प्रादेशिक परिवहन विभागाने कळविले आहे.