सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जिल्ह्याभरातील दररोज दहा ते पंधरा रुग्णांचं ऍडमिशन व डिस्चार्ज करणे ही सेवा आमच्याकडून चालू असते ज्या त्या विभागातील स्पेशलिस्ट डॉक्टर सर्जन यांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना सेवा दिली जाते सदरची रुग्णसेवा ही शासकीय योजनेअंतर्गत होत असते व पूर्णपणे मोफत असते त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल ची आम्ही कधी पोस्ट टाकत नाही.....
पण सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सुद्धा असे काही ऑपरेशन होत असतात जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खर्चिक व न परवडणारे ऑपरेशन असतात आणि ते ऑपरेशन सिव्हिलचे डॉक्टर्स व तेथील असणाऱ्या शासकीय योजनांचा वापर करून डॉक्टर्स आपला जीव पणाला लावून ते ऑपरेशन सक्सेस करून दाखवतात त्यासाठी त्यांचे कौतुक करणे गरजेचे होते...
मागील आठवड्या मध्ये काही मित्रानी आमच्याकडे येऊन एका पेशंट संदर्भात चर्चा केली बऱ्याच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची मेंदूची शस्त्रक्रिया करणे गरजेची होती, सदरचा मेंदूचा आजार लाखो जणांमध्ये कुठेतरी एखाद्याला होत असतो त्याला, Trigeminal neuralgia असे म्हणतात प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खूप खर्चाची बाब होती व सोबत ऑपरेशन सक्सेस होईल अशी गॅरंटी कोणी देत नव्हते, सदरचे सर्व रिपोर्ट्स आम्ही डॉक्टर अभिनंदन पाटील सर जे मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मेंदू विकार तज्ञ डॉक्टर आहेत त्यांना दाखवली त्यांनी थोडे दिवस औषधे देऊन बघितलं पण ते दुखणं काय थांबत नव्हते ऑपरेशन करणे गरजेचे होतं ऑपरेशन फार किचकट व शर्तीचे होते सदरची बाब हॉस्पिटलचे डॉक्टर रुपेश शिंदे सर यांच्या निदर्शनास आणून दिले त्यांनी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर अभिनंदन पाटील सरांची चर्चा केली. ऑपरेशनची तारीख ठरली जवळपास सहा तास ऑपरेशन चालू होतं डॉक्टर अभिनंदन पाटील यांनी आपलं कौशल्य पणाला लावून ते ऑपरेशन सक्सेस करून दाखविले...आणि सिव्हिल हॉस्पिटल बद्दलचा जो गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे तो त्यांनी पुन्हा एकदा पुसून काढला....
आज पेशंट आयसीयू मधून जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आलं. डॉक्टर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचं आज आम्ही भेट घेऊन कौतुक व सत्कार केला..
यावेळी उपस्थित काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते माजी नगरसेवक करीम भाई मिस्त्री आरोग्य जिल्हाप्रमुख नगरसेवक आयुब भाई बारगीर अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष इर्शाद भाई पखाली, नौशाद भाई नदाफ, अल्पसंख्यांक शहर जिल्हा उपाध्यक्ष अझहर भाई सय्यद, रमजान भाई मुजावर इम्रान भाई पठाण, रुग्णांचे नातेवाईक कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष आभार: जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रम सिंग कदम, डॉक्टर रुपेश शिंदे डॉक्टर अभिनंदन पाटील डॉक्टर प्रमोद चौधरी व कर्मचारी