◼️भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मंगी ता.राळेगाव जि.यवतमाळ येथे शाखा स्थापन
राळेगाव- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमीत्य शाखा बांधणी अभियानांतर्गत राळेगाव तालुक्यातील मंगी या गावात शाखा स्थापन करण्यात आली.याप्रसंगी गावात रॅली काढुन पक्षाच्या नामफलकाचे जेष्ट नेते काॅ.गुलाबराव उमरतकर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.झालेल्या सभेत काॅ.अनिल हेपट,काॅ.अनिल घाटे,काॅ.बंडु गोलर,अथर्व निवडिंग,राहुल रामटेके,राळेगाव तालुका सचिव काॅ.प्रविण आडे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी पक्षाची शाखा स्थापन करुन शाखा कौंसील निवडण्यात आली त्यामध्ये शाखा सचिव शत्रुघ्न सोयाम,सहसचिव रुपेश पेंदाेर,मनोहर मांडोकर,कोषाध्यक्ष गणपत वडसकर,सदस्य बाबाराव सखाराम,दिपक पेंदोर,सखाराम तोडासे,मनोज कोवे,गणपत वडसकर,दुर्गा पेंदोर,चंद्रकला सोयाम,निर्मला कोवे,ज्याेती पेंदोर,मंगला वडसकर,कचराबाई वडसकर,शोभा माडवकर,पार्वताबाई वडसकर,रामाजी वडसकर,संतोष अरके,वैशाली अरके,जिजाबाई मेश्राम,प्रल्हाद मेश्राम यांचा समावेश आहे.