खानापूर आटपाडीचे आमदार श्री. सुहास बाबर यांनी शक्तिपीठ महामार्ग खानापूर आटपाडी मतदार संघातून करण्याबाबत विधान केले आहे. पण ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना जमिनीचा मोबदला किती देणार आहेत, याबाबत ते काहीच बोलले नाहीत.
खानापूर तालुक्यातून पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड महामार्ग प्रस्तावीत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार आहेत, ते शेतकरी अस्वस्थ आहेत. त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहीजे म्हणून ते शेतकरी आंदोलन करीत आहेत. पाठीमागील तीन वर्षांत आमदार सुहास बाबर त्याबद्दल काहीही बोलत नाहीत. विजापूर गुहागर महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत झाल्या आहेत. त्याबाबत आमदार काहीच बोलत नाहीत. मग तुमच्या राजकीय दबावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घ्यायचा विचार आहे काय? तसे असेल तर खानापूर आटपाडील शेतकरी देखील शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात उभा राहील. त्यामुळे, तुमच्या विकासाच्या आड कोणीही येणार नाही पण ज्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत होतील त्यांना मोबदला किती देणार, हे प्रथम जाहीर करावे, मगच महामार्गाबाबत बोलावे. असे अवाहन आम्ही करीत आहोत.
आपले,
काॅम्रेड उमेश देशमुख, सतिश साखळकर, प्रभाकर तोडकर, प्रविण पाटील, उमेश एडके, यशवंत हारुगडे, सुनिल पवार,