सांगली दि.03 व 04-01-2025 - सांगली शिक्षण संस्थेचे श्री.म.के.आठवले विनय मंदिर, सांगली या शाळेचा इ.1 ली ते 4 थी चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रम दि.03-01-2025 व दि.04-01-2025 रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.रविंद्र वि. देवधर, शाला समितीचे अध्यक्ष श्री.विनायक श्री. कुलकर्णी व प्रमुख पाहुणे मा.डॉ.श्री.नागेश प्र. नाईक व डॉ.सौ.शितल ना. नाईक, मा.श्री.यशवंत गु. कुलकर्णी व मा.सौ.दिपाली य. कुलकर्णी यांचे शुभहस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झाले. ईशस्तवन व स्वागत गीत इ.3 री व इ.4 थी च्या विद्यार्थीनींनी सादर केले. पाहुण्यांच्या परिचय मुख्याध्यापक सौ.विद्या वि. बोळाज यांनी केले. एन्डौमेंटचा गोषवाराचे वाचन सौ.अपर्णा वि. कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे शुभहस्ते इ.1 ली ते इ.4 थी च्या विद्यार्थांना पारितोषिक वितरण, एन्डौमेंट पारितोषिक वितरण व नाटकात सुयश प्राप्त केलेल्या कलाकारांचे, नेपथ्थ, रंगभुषा, प्रकाश योजना कलाकारांचे सत्कार करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखीत ’मनस्विनी अहिल्या’ चे प्रकाशन मा.डॉ,सौ.शितल ना. नाईक यांचे शुभहस्ते व इ.4 थी ’आम्ही’ चे प्रकाशन मा.सौ.दिपाली य. कुलकर्णी यांचे शुभहस्ते करण्यात आले.
प्रशालेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे इ.१ ली व इ.२ री ‘नाट्य दर्पण’ चे उद्घाटन प्रशालेचे माजी विद्यार्थीनी व नाट्य अभिनेत्री कु.वैष्णवी उ. शेटे आणि इ.३ री व इ.४ थी ‘नाट्य दर्पण’ चे उद्घाटन सुप्रसिध्द गायक श्री.अभिजीत प्र. काळे यांचे हस्ते नटराज पुजन झाले. बालवाडीकडील सेवक, दाई आणि कार्यालयाकडील लिपीकांचे यथोचित सत्काराही झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्यासाठी पालकांकडून प्रतिसाद मिळाला.
कार्याध्यक्ष श्री.सदाशिव ग. पितांबरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.बाबा रा. माने, श्री.गजानन शं. दरुरे, श्री.ज्ञानेश्वर ब. पोतदार व सौ.स्नेहलता जी. दळवी यांनी केले. पर्यवेक्षक नानासाहेब रा. खाडे व शिक्षकांनी नेटके संयोजन केले.
सदर कार्यक्रमास सांगली शिक्षण संस्थेचे कार्यवाह मा.श्री.शिरिष वा. गोसावी, सांगली शिक्षण संस्थेचे मान्यवर संचालक, माजी सहाय्यक शिक्षिका सौ.नंदिनी म. सपकाळ व मान्यवर हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.