महिला मंडळ प्राथमिक शाळा
पंढरपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त आणि बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित, एकांकिका ,नृत्य सादर करण्यात आले.
त्याचबरोबर सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त निर्भया पथकाद्वारे मुलींचे रक्षण आणि पथकाचे विविध कार्य यांची माहिती पोलीस कॉन्स्टेबल निर्मला वाघमारे यांनी दिली . महिला मंडळ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शितल अण्णासाहेब लोखंडे तसेच डॉक्टर वर्षा काणे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मोरे मॅडम यांनी केले .