मा.श्रीमती रूपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेस सदिच्छा भेट दिली आहे.
मा शुभम गुप्ता आयुक्त मनपा यांनी स्वागत केले आहे. उपआयुक्त विजया यादव ,पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंता ,सहा आयुक्त डोईफोडे ,सचिन सांगावकर, प्रज्ञा त्रिरण ,अनिस मुल्ला,विनायक शिंदे, डॉ रवींद्र ताटे ,डॉ.वैभव पाटील सुनील पाटील , सर्व विभाग प्रमुख या वेळी उपस्थित होते,
या मा.श्रीमती रूपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी या वेळी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजबाबत समाधान व्यक्त केले आहे. मा आयुक्त आणि त्यांच्या टीम यांचे अभिनंदन केले आहे. या वेळी मा.श्रीमती रूपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी
मनपा क्षेत्रातील गर्भनिदान केंद्रास भेट देऊन तपासणी करावी ही कारवाई तात्काळ करण्याची आहे .
महिला स्वच्छता गृह नव्याने उभे करून आहे जे आहेत त्यांची दुरुस्ती करून घ्यावी , अशी सूचना दिल्या आहेत, नाले सफाई स्वच्छता या वर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्या बाबत सूचना दिल्या आहेत.
या वेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी , प्रा पद्माकर जगदाळे , जिल्हा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष , विष्णू माने उप अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, श्रीमती जयश्री पाटील जिल्हा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष , जमिल बागवान अध्यक्ष शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस, बिरेंद्र थोरात , अत्तहर नायकवडी,
सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या वेळीं मा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते मा.श्रीमती रूपाली चाकणकर , राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आला.