मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व पुणे -एर्नाकुलम पूर्णा एक्सप्रेसचा कोटा वाढवून मिळावा, नागरिक जागृती मंचची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/12/2024 3:52 PM

*मध्य रेलवे मुंबई मुख्यालयातील वरिष्ठ अधिकार्याच्या आडमुठ्या धोरणामुळे मध्य रेलवेला प्रत्येक वर्षी 55 लाख रुपए नुकसान होणार*

*मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अनआरक्षित व आरक्षित तिकिटांचा आकडा विचारात न घेताच दादर-हुबळी एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडी थांबा रद्द करण्याचे कारस्थान रचले ज्याच्यामुळे रेल्वेची तिकीट विक्री कमी होईल व मोठे नुकसान होणार आहे*

*नुकसानीस जबाबदार मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व दादर हुबळी एक्सप्रेस चा किर्लोस्करवाडी स्टेशनचे तिकीट विक्री पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी प्रवासी करत आहेत*

*दादर-हुबळी एक्सप्रेसला 24 डबे लावून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सोडावी व किर्लोस्करवाडीचा थांबा कायमी सुरू ठेवावा. अन्यथा मोठे आंदोलन होईल* 
सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष श्री सतीश साखळकर यांचा ईशारा

सांगली जिल्ह्यातील 5 तालुक्यांसाठी मध्यवर्ती असलेले किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक तसेच जगातील सर्वात मोठा पंप कारखाना असलेले हे रेल्वे स्थानक आहे सुमारे सात लाख लोकसंख्या किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर अवलंबून असते.  किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनचे प्रति फेरी उत्पन्न हे जवळच्या सातारा रेल्वे स्टेशन पेक्षा जास्त आहे.

तरीही किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर नवीन कुठल्याच रेल्वे गाडीला थांबा देण्यात येत नव्हता पण किर्लोस्करवाडी तील प्रवासी संघटनांनी अनेक वर्षे प्रयत्न करून दादर हुबळी एक्सप्रेस या गाडीचा थांबा किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर मिळवला वास्तविक किर्लोस्करवाडी येथून कर्नाटकात सकाळी जाणारी ही एकमेव रेल्वे गाडी असून दररोज किर्लोस्करवाडी होऊन पुणे मुंबईच्या दिशेने सुमारे 80 जनरल तिकीट धारक प्रवासी प्रवास करतात त्याचप्रमाणे किर्लोस्करवाडी येथून सांगली मिरज कुडची घटप्रभा बेळगाव लोंढा धारवाड हुबळी या दिशेने रोज 30-35 जनरल तिकीट धारक या गाडीने प्रवास करत आहेत. एकूण 115 जनरल तिकिट धारक दादर-हुबळी एक्सप्रेसने किर्लोस्करवाडीतून प्रवास करतात. सरासरी एका तिकिटाचे रुपये 90 च्या आसपास असेल. दादर हुबळी एक्सप्रेस मध्ये किर्लोस्करवाडीतून प्रवास करणाऱ्या 115 जनरल अनारक्षित तिकिटांची रोजची कमाई रू 10 हजारच्या आसपास आहे. 

त्याचप्रमाणे येऊन जाऊन रोज 25 आरक्षित तिकिटे दादर हुबळी एक्सप्रेसमध्ये किर्लोस्करवाडी स्टेशन वरून विक्री होत आहेत. सरासरी 200 रुपये एका आरक्षित तिकिटाचे असेल. किर्लोस्करवाडीतून दादर हुबळी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या आरक्षित 25 प्रवाशांची कमाई रोजची सुमारे 5 हजार आहे.

*अनआरक्षित तिकिटांची रोजची कमाई 10 हजार व आरक्षित तिकिटांची कमाई 5 हजार मिळून रोज एकूण 15 हजारच्या आसपास दादर-हुबळी एक्सप्रेसची किर्लोस्करवाडी स्टेशनची कमाई आहे. 

म्हणजेच प्रत्येक वर्षाला सुमारे 55 लाख रुपयांची कमाई दादर-हुबळी एक्सप्रेस मुळे मध्य रेल्वेला होणार आहे. पण हे काहीही गृहीत न धरता मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिनांक 6 जानेवारीपासून किर्लोस्करवाडी स्टेशनचा दादर-हुबळी एक्सप्रेसचे बुकिंग रद्द केले आहे. 

प्रवासी वारंवार किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनचे हेलपाटे खात आहेत. पण 6 जानेवारी नंतरची तिकीट विक्री चालू होईल की नाही याबद्दल कोणीच त्यांना समाधानकारक उत्तर देत नाही. काही प्रवासी संघटनांच्या मते रेल्वेचे अधिकारी दादर-हुबळी एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडी थांबा रद्द करण्यात यासाठी प्रयत्नशील आहेत असे कळले आहे.

ज्या अधिकाऱ्यांनी दादर-हुबळी एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडी थांबा बंद रद्द करण्याचे कारस्थान केले आहे त्यांच्यामुळे रेल्वे विभागाला वार्षिक 55 लाख रुपये नुकसान होणार असून अशा दोषी
अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच ने मध्य रेल्वेला आवाहन केले आहे की त्यांनी त्वरित 6 जानेवारीपासून पुढच्या तारखांसाठी दादर-हुबळी एक्सप्रेसचे किर्लोस्करवाडी स्टेशनचे आरक्षित तिकीट बुकिंग सुरू करावे.  दादर हुबळी गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून 24 डब्बे लावून सोडावी व किर्लोस्करवाडीचा थांबा कायममी सुरू ठेवावा.

जर येत्या 3-4 दिवसात मध्य रेल्वेने सकारात्मक निर्णय घेऊन दादर-हुबळी एक्सप्रेसला 24 डब्ब्यांची करुन किर्लोस्करवाडीचा थांबा कायमी न केल्यास किर्लोस्करवाडी स्टेशनवर जिल्ह्यातील सामान्य नागरिक व प्रवासी संघटनांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करण्यात येईल. 

सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष श्री सतीश साखळकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की मूळच दादर-हुबळी एक्सप्रेस ही गाडी फक्त १४ डब्यांची असून या गाडीत फक्त स्लीपरचे 6 डबे व एसी चे 2 डब्बे असे 8 डब्बेच आरक्षणासाठी उपलब्ध असतात. अशा परिस्थितीत मुंबई पनवेल ठाणे पुणे सांगली मिरज बेळगाव हुबळी धारवाड सारख्या स्टेशनवरून तिकीट विक्री होते

उरलेली तिकिटे किर्लोस्करवाडीच्या लोकांना मिळतात. त्यामुळे किर्लोस्करवाडीच्या लोकांना अनआरक्षित जनरल तिकिटे काढूनच प्रवास करावा लागतो. कमी डब्बे असलेल्या गाडीत आरक्षित तिकिटांचा निकष लावून थांबा रद्द करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे अनआरक्षित तिकिटांची विक्री गृहीत धरूनच किर्लोस्करवाडीत दादर-हुबळी एक्सप्रेसचा थांबा कायमी करावा.

 त्याचप्रमाणे दादर-हुबळी एक्सप्रेस गाडी 14 डब्ब्या ऐवजी 24 डब्यांची करावी जेणेकरून किर्लोस्करवाडी बरोबरच इतर स्टेशनच्या लोकांनाही भरपूर तिकिटे मिळतील व प्रवास करू शकतील.

देशात सर्वच रेल्वे गाड्या 24 डब्यांच्या धावत असताना दादर-हुबळी एक्सप्रेस फक्त 14 डब्यांची ठेवायची व त्यानंतर एखाद्या स्टेशनवर विक्री होत नाही असे कारण देऊन थांबा रद्द करायचा हे जनतेवर खूप मोठा अन्याय असून असा अशा प्रकारचा अन्याय सहन करून घेतला जाणार नाही.

--------------------------------------------------------
आदरणीय श्री धर्मवीर मीणा साहब
जनरल मैनेजर
मध्य रेल
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
ता 19 दिसंबर 2024


विषय : गाड़ी 11097 पुणे-एर्नाकुलम पुर्णा एक्सप्रेस के रिजर्वेशन सिस्टम में खराबी की बारे में शिकायत और सांगली स्टेशन का कोटा बढाने की मांग

आदरणीय महोदय,

रेलगाडीयों का अडवान्स रिझर्वेशन 2 महिने पहले होता है |
लेकीन गाडी 11097 पुणे-एर्नाकुलम पुर्णा एक्सप्रेस का रिझर्वेशन सिर्फ 25 दिन पहले ही मिलता है| 

ऑनलाईन रिझर्वेशन सिस्टीममें 25 दिन से 60 दिन तक का रिझर्वेशन सस्पेंड दिखाता है| और जब रिझर्वेशन 25 दिन पहले खुलता है तो वेटींग होता है | सांगली स्टेशन पर ईस गाडीका कोटाभी बहुत कम है |

ता 19 दिसंबर को ता 11 जानेवारी तक का रिझर्वेशनही हो पा रहा है |
19 जानेवारी से 16 फरवरी तक का रिझर्वेशन सस्पेंड है |

ईसलिए यात्रीयोंको सांगली स्टेशनसे IRCTC से ईस गाडी का कन्फर्म रिझर्वेशन टिकीट नहीं मिल पाता

लोगोंको आशंका है की रिजर्वेशन सिस्टममें खराबी है | 

हमारा अनुरोध है की 

1) रिझर्वेशन सिस्टीम की गडबडी तुरंत ठिक करके अगले 60 दिन का गाडी 11097 का रिझर्वेशन शुरू किया जाये

2) गाडी 11097 का सांगली स्टेशन का कोटा बढाया जाये

3) 11097/11098 सप्ताहिक गाड़ी को दैनंदिन रोज चलाया जाए यह भी लोगों की मांग है क्योंकि पूरे वर्ष यह गाड़ी वेटिंग लिस्ट में रहती है

आपका विश्वासू
सतीश साखळकर, अध्यक्ष,
सांगली जिल्हा नागरिक जाग्रुती मंच

Share

Other News

ताज्या बातम्या