अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये हयासाठी लोकहित मंचची १ जानेवारी पासून सह्यांची मोहीम

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/12/2024 4:49 PM

    .सांगली: सांगली व कोल्हापुरला महापुराचा धोका निर्माण करणार्‍या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतले आहे. या निषेधार्थ लोकहित मंचच्यावतीने एक जानेवारीपासून सह्यांची मोहिम सुरू केली जाणार आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, अशी विनंती करणारे नागरिकांच्या सह्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व कर्नाटक, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिली.
ते म्हणाले, पावसाळ्यात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका निर्माण करणार्‍या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची आणखी पाच मिटरने वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. आता कर्नाटकने परवानगीसाठी केंद्राला साद घातली आहे. ही परवानगी मिळाल्यास सांगलीला महापुराचा धोका निर्माण होणार आहे. सांगलीत महापुरामुळे व्यापारी व नागरिकांचे प्रचंड नुकसान होते.
 महापूर येण्यास कर्नाटक येथील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढता कामा नये. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. शिवाय महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहिम एक जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. सांगली शहर, सांगलीवाडीसह आसपासच्या ग्रामीण भागात देखील ही मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती मनोज भिसे यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या