सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात महिला वर्गासाठी पिंक टॉयलेट ची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी संकल्प युवा संघटनेची होती. संकल्प युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात पिंक टॉयलेटच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे. महापालिकेच्या आढावा बैठकीमध्ये राज्य महिलांच्या अध्यक्षा मा. रूपालीताई चाकणकर यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात पिंक टॉयलेटच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत संकल्प युवा संघटनेच्या मागणीवरून मा.आयुक्त शुभम गुप्ता साहेब आणि अधिकारी वर्गाला महापालिका क्षेत्रातील सद्यस्थितीतील स्वच्छतागृहे व त्यांची स्थिती याबाबतचा अहवाल सादरीकरण व मार्गदर्शक सूचना केल्या. सार्वजनिक ठिकाणी मुव्हेबल टॉयलेट्स उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. मा. आयुक्त साहेबांनी ही यावर तत्पर कार्यवाही करत अधिकारी वर्ग व कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह पाहणे व अहवाल सादरीकरण यावर योग्य त्या सूचना केल्या.
राज्य महिला आयोगाचा अध्यक्षा मा.रूपालीताई चाकणकर यांनी संकल्प युवा संघटनेच्या मागणीवरून पिंक टॉयलेटच्या अंमलबजावणीच्या बाबत घेतलेल्या अभ्यासपूर्ण कृतिशील भूमिकेचे व सांगली महापालिकेचे आयुक्त शुभमजी गुप्ता यांनी केलेल्या तत्परतेने कार्यवाहीचे सर्वत्र स्वागत होत आहे.