कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भात मागणी होत आहे. सदर धरणाची उंची वाढवली गेल्यास सांगली सह कृष्णा नदीपट्ट्यातील महापुराची शक्यता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या धरणाची उंची वाढवल्यास महापुराचा धोका वाढणार असल्याचे माहित असूनही सांगली जिल्ह्यातील आमदार,खासदार मात्र कोणतीच प्रतिक्रिया अथवा विरोध न करता मूग गिळून गप्प का आहेत?शासकीय आणि राजकीय स्तरावर त्यांनीही याला विरोध दर्शवण्याची गरज आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारा जिल्हा म्हणून सांगली जिल्ह्याकडे पाहिले जाते परंतु या अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानंतर येणाऱ्या महापुराने या सांगलीचे अस्तित्व पाण्यात वाहून जाण्याची शक्यता वाढली आहे. या सांगलीचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक अस्तित्व टिकवायचे असेल तर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी याला तीव्र विरोध करण्याची गरज भासत आहे. सामाजिक स्तरातून आम्ही याला विरोध करतच आहोत परंतु प्रशासकीय आणि राजकीय दबाव या आमदार खासदारांनी सरकारवर टाकायला हवा? नाहीतर सांगली पाण्यात बुडताना उघड्या डोळ्यांनी पहावी लागेल.
*आमदार खासदारांनो वेळीच जागे व्हा... नाहीतर... सांगली फक्त नकाशातच दिसेल...*
*मनोज भिसे-*अध्यक्ष लोकहित मंच सांगली*