राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मध्यवर्ती निदान केंद्र प्रमुख काका हलवाई व कर्मचाऱ्यांचा सत्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/12/2024 6:34 PM

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहरजिल्ह्याच्यावतीने सां.मि.कु महानगरपालिकेच्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज मध्यवर्ती निदान केंद्रास देशपातळीवरील स्कॉच पुरस्काराने गौरवण्यात आलेबद्दल केंद्र प्रमुख काका हलवाई तसेच महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राच्या सर्व कर्मचारी आदी वर्गाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते मा.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेले 
सां.मि.कु महानगरपालिकेच्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज मध्यवर्ती निदान केंद्राचा लाखो रुग्णांना  फायदा झाला आहे.

 सांगलीचे तत्कालीन पालकमंत्री असताना महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असताना
जयंत पाटील साहेबांच्या महत्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णयांपैकी महत्वाची संकल्पना म्हणजे
 सां.मि.कु महापालिकचे मध्यवर्ती निदान केंद्र . देशातील एकमेव असे निदान केंद्र आहे जे की रुग्णांसाठी अत्यंत अल्प दरात तसेच अनेक चाचण्या या केंद्रामार्फत मोफत केल्या जातात.
या सां.मि.कु महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राची  दखल आज देश पातळीवर घेऊन स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहराध्यक्ष व मा.नगरसेवक सागरदादा घोडके,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.पृथ्वीराज पाटील,
शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र आरोग्य संघटनेचे सांगली जिल्हाप्रमुख उमरभाई गवंडी आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या