नांदेड :- अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून 16 डिसेंबर पासून प्रत्यक्षरित्या व ऑनलाईन अर्ज मागविण्यात आली आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर याबाबत ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत मंगळवार 31 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
नांदेड जिल्ह्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय 3 चर्च पथ पुणे या कार्यालयात मुदतीत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सन 2024-25 मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्यांक विभागाने मंजुरी दिली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.