भगूर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 09/08/2025 10:32 PM

 भगूर येथे ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी समाज उत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने व मा नगरसेविका सौ संगिताताई मंगेश पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली 
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा आणि जोहार.अशा शुभेच्छा दिल्या 
आदिवासी आपल्या प्राचीन परंपरा आणि ऐतिहासिक संस्कृतीचे प्रतीक आहेत.
चला, जगातील सर्वात सभ्य आणि प्राचीन आदिवासी संस्कृतीच्या संरक्षणासाठी आणि आदिवासी हितांच्या रक्षेसाठी संकल्प करूया.असा संदेश देण्यात आला तसेच या कार्यक्रमात मा श्री रमेश पवार मा पोलिस उप अधीक्षक तथा संस्थापक सावरकर उत्सव समिती भगूर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला मा पवार सो यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात एस टी महामंडळ निवृत्त वा चालक समितीचे सदस्य श्री सुनिल घोरपडे यांना निवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार केला या कार्यक्रमात सुत्र संचालन श्री संतोष पिंपळे सर यांनी केले या कार्यक्रमात मातृशक्ति मा सुरेखा ताई हांडगे, संगिताताई घोरपडे,मा नगरसेविका सुमनताई घोरपडे,मा सरपंच सारीका ताई निंबेकर, प्रमिला ताई मुकणे, अलका ताई कुल्हाळ, कल्पना पवार, नलिनी घोरपडे,आदिवासी समाज उत्सव समिती अध्यक्ष संजय घोरपडे, विठ्ठल कुल्हाळ, संतोष बांडे, विश्वनाथ वाघ, भांगरे, कैलास निंबेकर, सचिन मुकणे,राजू जाधव, मंगेश पिंपळे इतर मान्यवर उपस्थित होते 🙏🏼

Share

Other News

ताज्या बातम्या