आदरणीय श्री धर्मवीर मीणा जी
जनरल मॅनेजर
मध्य रेल्वे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबई
विषय: सांगलीत चिंतामणीनगर रेल्वे पुलाचे प्रलंबित काम पूर्ण व्हावे व सांगली रेल्वे स्टेशनच्या 5 जुलै रोजी झालेल्या धरणे आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी रेल्वे रोको आंदोलन
आदरणीय महोदय,
दिनांक 5 जुलै रोजी सांगली रेल्वे स्टेशनवर सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच वती सांगली जिल्ह्यातील विविध संस्थांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात रेल्वे प्रशासनाला सांगली रेल्वे स्टेशनच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. पण या विषयावर रेल्वे प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसून कोणत्याही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.
त्याचप्रमाणे सांगली शहरात चिंतामणीनगर येथे सांगली-तासगाव रस्त्यावरील महत्त्वपूर्ण रेल्वे उड्डाणपुलाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या पुलावर स्ट्रीट लाईट नसल्याने प्रवाशांना अंधारातच पुलावरून जावे लागत आहे. त्याचप्रमाणे पुलावरील फुटपात व सर्विस रोडचे काम देखील अपूर्ण आहे. तसेच पुलावर झालेले डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे या पुलाववर तसेच रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून वाहनधारकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे.
सांगलीतील चिंतामणीनगर रेल्वे पुलाचे काम त्वरित पूर्ण करावी तसेच सांगली रेल्वे स्टेशन बाबतच्या खालील मागण्या त्वरित पूर्ण कराव्या यासाठी 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगली येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे
1) गाडी 12629/12630 निजामुद्दीन-यशवंतपुर संपर्क क्रांतीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा
2) गाडी 22155/22156 कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेसला सांगली मार्गे सुरु करून सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा. कोल्हापूर-मिरज-सांगली-मिरज-कलबुर्गी अशा मार्गे ही गाडी दोन्ही दिशेने धावू शकते.
3) हुबळी-मिरज एक्सप्रेस, लोंढा-मिरज एक्सप्रेस, बेळगाव-मिरज पॅसेंजर, कॅसलरॉक-मिरज पॅसेंजर तसेच कुर्डूवाडी-मिरज डेमो पॅसेंजर या सर्व गाड्या सांगली रेल्वे स्टेशन पर्यंत विस्तारित करावे व या सर्व गाड्यांना विश्रामबाग रेल्वे स्टेशनवर देखील थांबा द्यावा.
आमच्या मागील पत्राप्रमाणे रेल्वे रोको आंदोलनाची पूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल.
आपला विश्वासू
सतीश साखळकर
अध्यक्ष, सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच