#7वर्षाच्या_अविरत_प्रयत्नांना_यश_
आल्याचं_समाधान
ऑगस्ट 2018 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली, आणि प्रभागातील नागरिकांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून भरघोस मतांनी निवडून दिलं. तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 18 म्हणजे प्रचंड समस्यांचा आगार असलेला प्रभाग. या प्रभागात ड्रेनेज असेल गटार असतील, सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था असेल, पावसाळी पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था असेल, नव्याने विकसित झालेल्या परिसरामध्ये रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल अशा सर्वच पायाभूत सुविधा बाबतीत काम करावे लागतं, आणि यावर म्हणजे सगळ्यात अडचण असलेला शामराव नगर चा भाग. सोबतच या संपूर्ण प्रभागांमध्ये पूर्वी असलेले सर्वच नाले हे शेतकऱ्यांच्या अतिक्रमणातून, वीट भट्टी आणि गुंठेवारीच्या अतिक्रमणातून पूर्णपणे मुजवले गेलेत त्यामुळे या भागातील पावसाळी पाण्याचा निचरा अजिबात होत नाही आणि शामराव नगर सारख्या बशी सारख्या खोलगट भागात बारमाही संपूर्ण परिसरात पाणी साचून राहण्याची समस्या निर्माण झालेली आहे. या अशा सर्व समस्या बाबतीत काम करायचं होतं, आणि 2018 पासूनच मग यावर काम सुरु केलं होतं. त्यावेळी 1940 सालच्या नाले दर्शक नकाशाच्या प्रती ज्याला आपण टोपो ग्राफिक शीट म्हणतो त्या सर्वप्रथम मिळवल्या, त्यानंतर जागेवर जाऊन वस्तुस्थिती पाहिली, स्वतः जाऊन संपूर्ण भाग हा कृष्णा नदीपर्यंत पायाखाली तुडवला. यामध्ये हरिपूर रोड काळ्या वाटेपासून ते खरे क्लब हाऊस पासून कुंभार मळ्यापर्यंत संपूर्ण परिसर मी एकट्याने पालथा घातला आहे. या भागातील संपूर्ण नाल्यांची पाहणी झाल्यानंतर या परिसरातील पाण्याचा निचरा कसा होऊ शकतो याचा एक कच्चा आराखडा घेऊन त्यावेळचे तत्कालीन आयुक्त मा नितीन कापडणीस यांची भेट घेतली आणि त्यांना स्थळ पाहणीसाठी संपूर्ण शामराव नगर पासून जुना धामणी रोड खरे क्लब हाऊस पर्यंत आणि शंभर फुटी रोड पासून निलजी बामणी पुलाखालून कृष्णा नदीपर्यंत एक नाले नितीन कापडणीस यांच्यासोबत पायाखाली तुडवले आहेत, तदनंतर माननीय नितीन कापडणीस यांच्या सहकार्याने या सगळ्यासाठी आवश्यक असलेला अंकलीनाला शहरामध्ये डीपी रोड मार्किंग करून त्या बाजूने ग्रामीण हद्दीपर्यंत नेला. शामराव नगरहून लालबाग हॉटेलपर्यंत आणि हनुमान नगर हुन ए बी पाटील स्कूल पासून लालबाग हॉटेलपर्यंत मिळेल त्या मशिनरीच्या साह्याने त्या ठिकाणी मी काम केलय. आणि ग्रामीण भागात देखील नाले खुले करताना तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, तत्कालीन जिल्हा परिषद सीईओ जितेंद्र डुडी, त्यावेळचे तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार दगडू कुंभार, तत्कालीन प्रांत आणि गरज पडल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोबत सुद्धा चर्चासत्र घेऊन सदर नाला खुला करण्याबाबतच्या गरजा स्पष्ट केल्या. आणि मग काम सुरू झालं आणि पाणी वाहत झाल्याचे पाहून आणि ते कृष्णा नदीकडे जातंय हे पाहून मनाला प्रचंड समाधान वाटलं. आणि सोबतच कालिका नगर खिलारे मंगल कार्यालया जवळच्या परिसरात साचलेलं पाणी हे उद्या हॉटेलच्या दिशेने हरिपूर नाल्याकडे जाऊ शकतं आणि ते वाहतूक करण्यासाठी सुद्धा त्यावेळी तात्पुरत्या चरीवरती काम करत गेलो आणि त्या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात का होईना यश आलं. ते पाणी या दोन्हीही दिशेने निघू शकते या माझ्या संपूर्ण प्रयत्नाच्या भागाला त्यावेळी शिक्कामोर्तब झालं ज्यावेळी या भागातील पाणी निचऱ्यासाठी प्रायमुव्ह या कंपनीने सर्वे केला आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या संपूर्ण नकाशा मध्ये याच पद्धतीने पाणी निचरा करण्याबाबत गटारांच्या दिशा ठरवल्या, म्हणजेच याचा अर्थ माझे प्रयत्न योग्य दिशेने सुरू होते.
मधल्या काळात शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी आणि निधी मिळवण्यासाठी याबाबत योग्य ते सर्वे पूर्ण होऊन डीपीआर तयार व्हावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे आणि त्यासाठीच्या नोंदी सभागृहात आपणास निश्चित सापडतील, सोबतच फोटो व्हिडिओ स्वरूपात का होईना माझ्याकडे तसे पुरावे देखील उपलब्ध आहेत. ज्यामध्ये संदीप गुरव एजन्सी बरोबर आणि तसेच नंतर प्रायमुव्ह या कंपनीबरोबर संपूर्ण सर्वेसाठी पुन्हा पुन्हा वेळोवेळी मी हा परिसर पालथा घातला आहे, आणि हे मी बोलत नाही तर मी मगाशी म्हटलं तसं माझ्याकडे असलेले फोटो आणि व्हिडिओ हे त्याचे पुरावे आहेत, किंबहुना या दोन्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांशी किंवा मनपा अधिकाऱ्यांशी कुणीही चर्चा केली तर तेही तसं सांगतील की या कामांमध्ये माझी त्यांना झालेली मदत कोणत्या स्वरूपाची होती आणि मी त्यांना किती मदत करू शकलो हे नक्कीच स्पष्ट होईल. आणि मला हे केवळ आज यासाठी सांगायचं आहे, की मी 2018 पासून सातत्याने लढत आलेल्या लढ्याला आज यश आले आहे. आज संपूर्ण प्रभाग क्रमांक 18 मध्ये पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी जवळपास 320 कोटी इतका निधी पूर्ण यंत्र प्रकल्पाच्या माध्यमातून प्राप्त झाला आणि त्याची निविदा आज प्रसिद्ध झाली. सांगली मिरज आणि कुपवाड शहरासाठीच असणारा 611 कोटीचा हा प्रकल्प आणि त्यामध्ये केवळ प्रभाग क्रमांक 18 साठी असणारे 310 कोटी आणि त्यायोगे या भागातून होणाऱ्या संपूर्ण सांडपाणी पावसाळी पाण्याच्या निचऱ्याचे निराकरण हे गेल्या सात वर्षाच्या सातत्याने लढायची यश आहे. मी याबाबत निश्चितच सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त माननीय नितीन कापडणीस, त्यानंतरचे आयुक्त मा. सुनील पवार, त्यानंतरच्या आयुक्त मा शुभम गुप्ता आणि सध्याच्या आयुक्त मा सत्यम गांधी, यासोबत नेते माननीय विश्वजीत कदम साहेब, नेते माननीय जयंत पाटील साहेब आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाला सहकार्य करणारे आमदार माननीय सुधीर दादा गाडगीळ तसेच यामध्ये वेळोवेळी सभागृहात मला मदत करणारे शेखर इनामदार साहेब या सर्वांचे आभार मला निश्चितच मानायचे आहेत. सोबतच या सर्वांसोबत या प्रश्नासाठी माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी नगरसेविका मा स्नेहल सावंत, सामाजिक कार्यकर्ते रजाक नाईक, या परिसरातील काम करणारे जनकल्याण सेतू समितीचे सर्व सदस्य, सर्जेराव पाटील यांच्या कृष्णा महापूर समिती आणि बऱ्याचशा संस्था संघटनांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे त्या सर्वांचेच निश्चित आभार या ठिकाणी मानावे लागतील. आज रोजी प्रसिद्ध झालेल्या निविदेमुळे एका महत्त्वाच्या आणि नागरिकांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नाला या निमित्ताने सोडवणुकीची किनार मिळेल आणि ती किनार मिळण्यासाठी मी कुठेतरी काम करू शकलो त्याचं समाधान मला आजीवन राहील.
आता हा संपूर्ण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण कसा होईल त्यासाठी जागेवरती योग्य काम कसं होईल, जागेवरती असणाऱ्या सर्व अडचणी दूर करून घेऊन त्या वेळेला त्या प्रकल्पासमोर येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करून हा प्रकल्प नागरी सुविधा दृष्टिकोनातून पूर्ण करणे हे आता पुढील ध्येय असेल. त्यात प्रभाग क्रमांक 18 च्या सर्व नागरिकांचे मोलाचे सहकार्य, त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास हा देखील अमूल्य आहे. आणि इथून पुढे देखील याच विश्वासाला समोर ठेवून त्याची मनात जाणीव ठेवून हा प्रकल्प तर पूर्ण करूच पण सोबतच प्रभाग क्रमांक 18 च्या नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक समस्येला उभे राहून कसं काम करता येईल आणि ते कसं सोडवता येईल यासाठी मी कटिबद्ध असेल हा माझा शब्द पूर्वीही होता आणि आताही आहे कायम राहील, आपल्या सर्वांचे प्रेम स्नेह आणि आशीर्वाद असेच राहू द्या धन्यवाद.aa