कुपवाड मध्ये नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्ती गुजरात मधील वनतारा प्रकल्पात रवानगी केल्याप्रकरणी समस्त कुपवाडकरांच्या वतीने बुधवारी दि ६ रोजी भव्य जाहीर निषेध मूक मोर्चा (रॅली) काढण्यात आली.
मूक मोर्चा सांगता झाल्यानंतर प्रमुख प्रतिनिधीच्या उपस्थित सांगली जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या निषेध मूक मोर्च्याकरिता समस्त कुपवाड व परिसरातील, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेऊन. मठातील माधुरी महादेवी हत्ती नेल्याप्रकरणी जाहीर निषेध करण्यात आला. आपल्या माधुरीला परत आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करूया असा दृढ निश्चय करण्यात आला.
जोपर्यंत माधुरी महादेवी हत्ती मठाकडे दिले जात नाही. तो पर्यंत हा लढा असाच सुरू राहील. किंवा या पेक्षा तीव्र करण्यात येईल.