देवळालीचे पर्यावरण संरक्षण करणे काळाची गरज - भोर
प्रतिनिधी l देवळाली कॅम्प -
देवळाली कॅम्प शहर हे हवामान पलटण्यासाठी प्रसिद्ध असून येथील पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी गरज असल्याचे प्रतिपादन पर्यावरण आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर यांनी केले.
सेंट पैट्रीक स्कूल मध्ये पर्यावरण रॅलीचे आयोजन गुरुवार दिनांक ७ रोजी करण्यात आले असून त्याचा शुभारंभ वृक्षमित्र महाराष्ट्र शासन वनश्री पुरस्कार प्राप्त पर्यावरण आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर यांच्या हस्ते ध्वज दाखवून करण्यात आले पर्यावरण रॅली खंडेराव टेकडी कॅन्टोन्मेंट ऑफिस झेंडा चौक मिठाई स्ट्रीट जुने बस स्टॉप मार्गे पुन्हा सेंट पॅट्रिक स्कूलमध्ये सांगता करण्यात आले यावेळी माकड म्हणतो हूप हूप झाडे लावा खूप खूप झाडे लावा पृथ्वी वाचवा बेटी बचाव बेटी पढाव झाडे लावा झाडे जगवा हम सबका एकी नारा पडणा लिखना लक्ष हमारा प्रदूषण करू नका पृथ्वीला त्रास देऊ नका हरित देवळाली सुंदर देवळाली अशा घोषणांनी देवळाली दुमदुमन निघाली यावेळी मुला मुलींनी प्रात्यक्षिके सादर केली यावेळी मॅनेजर सिस्टर मारिया डिसूजा, प्रिन्सिपल सिस्टर ब्रिजेट गोन्साल्विस , सिस्टर मॅरी क्रिस्टीना क्रीडाशिक्षक मनोज कनोजिया रोशनी परदेशी सुरेश म्हैसधुणे सुगंधा झांबरे भावना रोकडे विशाल पाटील आदी शिक्षक रॅलीसाठी मार्गदर्शन करत होते