ज्यावेळी द्राक्ष बागायतदारांना दलाल फसवतात निसर्ग फसवते त्यावेळेला त्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते त्यावेळी राज्यकर्ते मग ते कोणत्याही पक्षाचे असून देत परदेशातून आयात करून त्यांना नुकसान भरपाई देत नाहीत...
मग कधी तर बेदाण्याला दर मिळत असताना चीन मधून छुप्या पद्धतीने बेदाणा आयात करून स्थानिक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे कारस्थान कोण करत आहे..
सध्या देशात व राज्यात एकाच राजकीय पक्षाची मक्तेदारी निर्माण झालेली आहे तसेच विरोधी पक्षातील सुद्धा लोकप्रतिनिधी सोयीनुसार वागत आहेत..
मग देशातील व राज्यातील मतदारांनी परदेशातील आयात राजकीय पक्ष व नेते आणावेत का असा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते असे वाटत आहे..
आपल्या तील काही घटकांना सोयीनुसार देशभक्ती आठवते ज्यावेळी आपल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या जीवन मरणावर प्रश्न येतो त्यावेळेला चायनाचा बेदाणा खाताना देशभक्ती कुठे जात असेल...
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा