सकाळी दहाची वेळ,
सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीत एका अंत्यसंस्कारासाठी जमलेली शंभर दीडशे मंडळी..
स्मशानभूमीतील...
सध्या चक्क चालू असलेल्या
गॅस दाहिनी शेडच्या बाहेर बारीक पावसामध्ये ताटकळत उभी...
गॅस दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार करायचे म्हणून....
*पण गॅस संपलेला... तिथे..चौकशी केली असता कळले की *महापालिकेकडून काही महिने गॅस वाल्याचे बिल दिले नसल्यामुळे*
*गॅस आलेला नाही*...
मग ओळखीतून फोन करून, गॅस एजन्सीला विनंती करून अर्ध्या पाऊण तासाने गॅस सिलेंडर आला आणि पुढील अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण झाले...
सांगली सारख्या एका नावाजलेल्या महापालिकेमध्ये इतकी दारुण परिस्थिती असावी यासारखे दुःख नाही...
*हतबल नागरिक आणि झोपलेल्या व्यवस्था* 🙄
केदार खाडिलकर यांच्या पोस्ट वरून
मा.आयुक्त साहेबांना विनंती आहे पर्यावरणाचा विचार करता गॅस दाहिनीला प्राधान्य देऊन सदर ठिकाणी गॅस पुरवठा सातत्याने राही याबाबत आरोग्य अधिकारी यांना आपण आदेश द्यावेत
तसेच लाकडांना पर्यायी म्हणून फ्री कास्ट याबाबत सुद्धा आम्ही कापडनीस साहेब आयुक्त असताना पासून तसेच पर्यावरण प्रेमी व गोशाळा सांभाळणारे व्यवस्थापक याबाबत पाठपुरावा करत आहेत याबाबत सुद्धा आपण सकारात्मकतेने विचार करावा अशी विनंती आहे
तसेच कोल्हापूर स्मशानभूमीच्या धरतीवर सध्या महापालिकेकडून मोफत अंत्यविधीसाठी साहित्य पुरवले जाते सर्व धर्मीयांसाठी यामध्ये ज्यांची ऐच्छिक इच्छा असेल त्यांनी अंत्यविधीसाठी चा खर्च महापालिकेत द्यावा अथवा स्मशानभूमीत दानपेटी ठेवावी दानपेटीची पद्धत कोल्हापूरमध्ये कित्येक वर्षापासून सुरू आहे तत्कालीन आयुक्त खेबुडकर साहेब असताना हा विचार झाला मात्र सवंग लोकप्रियते साठी सदर प्रकार हाणून पाडण्यात आला आहे याबाबत सुद्धा पोलीस एकदा विचार करावा आम्ही आपल्या सोबत असू.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.