कुपवाड शहर भाजपच्या वतीने मनपा प्रभाग ३ कार्यालयासमोर आंदोलन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/08/2025 8:32 AM

 भारतीय जनता पार्टी कुपवाड शहरच्या वतीने प्रभाग क्रमांक 03 कुपवाड  च्या कार्यालयासमोर अनियमित ,अपुरा ,कमी दाबाने पाणीपुरवठा तसेच समुद्रा स्ट्रीट लाइटिंग प्रायव्हेट लिमिटेडआणि महानगरपालिका विद्युत विभाग यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले .कार्यकारी अभियंता विद्युत विभाग अमरसिंग चव्हाण यांच्या  व शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग अमरहमजा मुलाणी साहेब यांच्या  लेखी उत्तरानंतर तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे  घेण्यात आले
त्यावेळी कुपवाड शहराध्यक्ष रवींद्र सदामते , ऋषिकेश उर्फ चेतन सूर्यवंशी , नवनाथ खिलारे , प्रकाश पाटील , अमीन शेख ,मुकुंद चव्हाण , मानस विपट , बसप्पा कोरती , प्रकाश लवटे , भगवान रुपनर , सचिन खोत , माने काका , शंकर , सौ. गंगुताई नाईक , सौ.लतिका कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या