कुपवाड शहरातील "ती" विहीर अजुनही आहे त्या स्थितीत, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/08/2025 8:59 PM

कुपवाड शहरातील ज्या विहीरीत पूर्वीपासून गणपती विसर्जन केले जाते त्या विहीरीची सध्या दयनीय व बिकट अवस्था आहे. सदर विहीरीवर जाळी मारू असे मनपा अधिकारी यांनी मागच्या वेळी आश्वासन दिले होते पण आजतागायत ती विहीर आहे त्या अवस्थेत आहे. सदर विहीरीत मोठया प्रमाणात कचरा असल्याने कुपवाडकरांनी गणेश विसर्जन कसे करायचे असा प्रश्न पडला आहे. 

तरी मनपा अधिकाऱ्यांनी किमान यावेळी तरी विहीरीची त्वरीत स्वच्छता करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खोत यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या