चिंतामण नगर रेल्वे पुलावर खड्ड्याविरोधात लोकहित मंचकडून रास्ता रोकोचा इशारा - पूलावर स्ट्रीट लाईट नसल्याने मेणबत्त्या लावून लक्षवेधी आंदोलन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/08/2025 4:50 PM

सांगली प्रतिनिधी
          सांगलीतील चिंतामणी नगर भागामध्ये रेल्वे पूल काही महिन्यापूर्वीच बांधण्यात आले असून एक वर्षही झाले नसताना या पुलावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेयत. त्या मुले नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्याचा अंदाज न आल्याने, आणि याठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने अंधार असल्यामुळे अनेक वेळा अपघातही झाले आहेत. याला पूर्णपणे राज्य शासन रेल्वे प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही मनोज भिसे आणि नागरिकांनी केलाय.
          सदर पुलाचे काम टक्केवारीतून दिले गेले असल्यामुळे  रस्त्याची गुणवत्ता शून्य असून,हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर जनतेच्या जीवाशी केलेला विश्वासघात आहे.त्यामुळे या ठेकेदाराची चौकशी झाली पाहिजे, दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई,PWD व रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे,संपूर्ण खर्च आणि कामाच्या गुणवत्तेची तात्काळ चौकशी करा,रस्त्याची दुरुस्ती व लाईटची तात्काळ योजना करावी अशी मागणी लोकहित मंच कडून करण्यात आली आहे.
          याबाबत मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे तक्रार करन्यात येणार आहे. दरम्यान येत्या आठ दिवसात ही कामे पूर्ण न झाल्यास सांगलीकर जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे.                  . यावेळी लोकहित मंचचे उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राजेश शिरटीकर, दिलीप मगदूम,सुनील भोसले,जयवंत पाटील, अबूबकर तहसीलदार आदी मान्यवर उपस्थित होते.*

Share

Other News

ताज्या बातम्या