संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तहसिल कार्यालयात सादर करावी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 16/01/2025 6:39 AM

नांदेड :  फेब्रुवारी महिन्याचे अनुदान शासन संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लवकरच उपलब्ध करून देणार आहे. मात्र त्यासाठी लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तहसिल कार्यालयात उपलब्ध करण्यात यावी, असे आवाहन सं.गां.नि.योजनेचे तहसिलदार संजय वरकड यांनी केले आहे. 

संजय गांधी निराधार योजनेचे तसेच श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असणाऱ्या नागरिकांनी आपल्या अद्यावत आधारकार्ड, आधारसंलग्न मोबाईल क्रमांक, बँकखाते दर्शविणारे पासबुक आदी सर्व माहिती तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कक्षात सादर करावे. तसेच संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे ही माहिती उपलब्ध करावी, असे आवाहन तहसिलदारांनी केले आहे. 

Share

Other News

ताज्या बातम्या