नांदेड :- ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोमवार 6 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे दुपारी 1 वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष राहुल प्र. पाटील हे राहतील.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी पी.एस. बोरगावकर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर पवार, ॲड. शलाका प. ढमढेरे हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे छ. संभाजीनगरचे संघटक बालाजी लांडगे, ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, संघटक ॲङ आनंद कृष्णापूरकर, उपाध्यक्ष डॉ. सायन्ना मठमवार यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या या कार्यक्रमास सर्व नागरिक, ग्राहकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले व तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी केले.