कुपवाड शहरातून एम. आय. डी. सी. कडे येताना वहानधारांना करावी लागते तारेवरची कसरत : सतीश मालू

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/09/2024 2:56 PM

कृष्णा व्हॅली चेंबरचे आयुक्तांना निवेदन.

कुपवाड : प्रतिनिधी

संत रोहिदास कमान चौक ते महावीर व्यायाम शाळेपर्यंतचा प्रवास  करीत असताना तारेवरची कसरत करावी लागते सदर प्रवास करीत असताना होणाऱ्या त्रासाबाबतचे निवेदन सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्याची माहिती कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली. 

संत रोहिदास कमान चौक ते महावीर व्यायाम शाळेपर्यंतचा एका बाजूचा कॉक्रिटीकरणचा रस्ता झालेला आहे. दुसऱ्या बाजूचा रस्ता हा झालेला नाही. दुसऱ्या बाजूच्या रस्त्याला २ रस्ते फुटलेले आहेत त्यापैकी एक रस्ता माधवनगरकडे जातो तर दुसरा झिल शाळेकडे. त्यामुळे सदर रस्त्यावर वाहनांची मोठी रांग लागत असते. तरस्त्यांवरून येताना उद्योजक व कामगारांना तारेवरची कसरत करून कुपवाड मधून एम.आय.डी.सी. कडे येताना कमीत कमी २५ ते ३० मिनिट वेळ खर्च करावा लागत आहे. त्यामुळे उद्योजक व कामगारांना उद्योगांकडे वेळेत पोहोचता येत नाही आहे. त्यामुळे त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे. कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये बाहेरील देशाचे गेस्ट हे सतत असतात सदर रस्त्यांमुळे त्यांच्याकडून ही रस्त्याचे हसू होत आहे. तसेच कोणतीही दुर्घटना झाली तर हॉस्पीटलमध्ये पोहोचण्यास वेळ होत आहे. वेळेअभावी कोणतीही जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे.

तरी सदर रस्त्याबाबत आपण लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढून उद्योजक व कामगारांना होणाऱ्या अडथळ्यामधून मुक्त करावे असे निवेदनात म्हंटले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या