मोकाट कुत्र्यांनी निष्पाप बालके व नागरिकांवर हल्ले केल्यास त्याची जबाबदारी महापालिकेची राहील : मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/09/2024 2:00 PM

प्रति,
मा. शुभम गुप्ता सो,

आयुक्त,
सांगली मिरज आणि  कुपवाड शहर  महानगरपालिका,
सांगली.

विषय: मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांबाबत महापालिका प्रशासनाची जबाबदारी बाबत...

माननीय महोदय,

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांबाबत आम्ही वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

आगामी काळात निष्पाप लहान मुलांच्यावर कुत्र्यांचा हल्ला झाला, तर याबाबत महापालिका प्रशासन जबाबदार राहील. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे, आणि याबाबत गंभीर पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे.

आम्ही आपल्याला कळवितो की, या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

धन्यवाद.

आपला विश्वासू,
मनोज भिसे ( अध्यक्ष- लोकहित मंच सांगली )

Share

Other News

ताज्या बातम्या