आयुक्त शुभम गुप्ता यांचे पर्यावरणपूरक कार्य कौतुकास्पद

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/09/2024 9:01 AM

स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड देतानाही त्यापासून प्लास्टिकचा कचरा होऊ नये तर त्यातून एका नव्या रोपट्याची नवनिर्मिती व्हावी असा पर्यावरणाचा विचार करणारे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली 2024 चा गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक गणेशोत्सव झाला आहे असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याचा गणेशोत्सव हा अतिशय मोठ्या स्वरूपात दैदिप्यमान तसेच नेत्र दीपक झाला सांगली मिरज कुपवाड महा नगरपालिका क्षेत्रातील लाखो लोक या गणेश नगरी च्या गणेशोत्सवात आणि आनंदोत्सवात संमेलित झाले होते परंतु याच वेळी सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनामार्फत गणेशोत्सव नंतरची स्वच्छता साफसफाई पर्यावरण पूरक गणेशोत्सव व्हावा यासाठी अतिशय बारकाईने नियोजन करण्यात आले होते आणि याचे श्रेय जाते ते म्हणजे माननीय आयुक्त शुभम गुप्ता आणि त्यांच्या एकूण टीमला. 
107 टन निर्मल्य गोळा करणे आणि ते गोळा करताना भक्तांच्या धार्मिक भावना न दुखवता त्यांच्या भावनांना आव्हान करून त्यांच्या कलाने घेऊन त्याचे रूपांतर पवित्र खतामध्ये करणे ही गोष्ट खरोखरच वाखण्य योग्य आणि कौतुकास्पद आहे 63 हजार मूर्ती पैकी 17 हजार पेक्षा जास्त मूर्ती कृत्रिम कुंडात सांगलीकरांनी भक्ती भावाने विसर्जित केल्या तर सुमारे दीड हजार मूर्ती दान स्वरूपात जमा केल्या गेल्या यावरूनच सांगलीकर जनतेमध्ये जागृत झालेला पर्यावरण पूरक दृष्टिकोन हळूहळू विस्तृत होत चाललेला आहे असे एकंदरीत चित्र दिसू लागले आहे अर्थात यामध्ये आणखी सुधारणा होऊन 100% पर्यावरण पूरक गणेशोत्सव व्हावा अशी प्रत्येक पर्यावरण प्रेमी ची इच्छा आहे यापुढे जाऊन कोणतेही प्रकारचे प्रदूषण न करणारा गणेशोत्सव व्हावा अशी इच्छा आम्ही व्यक्त करत आहोत हवा प्रदूषण पाणी प्रदूषण याचबरोबर वाढणारे ध्वनी प्रदूषण आणि त्यामुळे होणारे आजार हे सण उत्सव यानंतरचे कटू  दुष्परिणाम आहेत सांगलीकर जनतेमध्ये वेगाने जागरूकता निर्माण करण्यात महापालिका प्रशासनाचा सिंहाचा वाटा आहे येथून पुढे होणारे सर्व गणेशोत्सव व सर्व सण पर्यावरण पूरक व्हावेत या अपेक्षेसह माननीय आयुक्त शुभम गुप्ता व त्यांचे टीमचे मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद - 


मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या