भगूर नगरपालिकेची सार्वजनिक शौचालय संडास पडल्यामुळे पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे व्यापाऱ्यांची व नागरिकांची गैरसोय नगरपालिकेने पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा भगूर नगरपालिकेवर संडास डबा आंदोलन अशी मागणी श्री काकासाहेब देशमुख उबाठा शिवसेना शहरप्रमुख भगुर
भगूर नगरपालिकेची प्रभाग क्रमांक तीन मधील भगूर नगरपालिकेच्या मागील मध्यवर्ती ठिकाणी असणारे शौचालय अति पावसामुळे जीर्ण झाल्यामुळे एक महिन्यापूर्वी सदरील शौचालय हे पडल्यामुळे सदरील शौचालय भगूर नगरपालिकेने बंद केले आहे सदरील शौचालय व मुत्री भगूर शहरातील मुख्य बाजारपेठेत असल्यामुळे प्रभाग क्रमांक तीन चार व पाच अशा तीन प्रभाग मिळून एकच शौचालय असल्यामुळे या शौचालयवर मोठ्या प्रमाणात लोड असतो त्यामुळे हजारो नागरिकांची गैरसोय झाली असून मुत्रीसाठी नागरिकांना व्यापाऱ्यांना इतर ठिकाणी जवळपास सोय नसल्यामुळे नगरपालिकेच्या दवाखान्याच्या परिसरात नगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर वास्तूवर व परिसरातील असलेल्या दुकानदारांच्या तसेच घरावर दिवसा व रात्रीच्या वेळेस उघड्यावर लघवी विधी करतात त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे पसरली आहे सदरील नागरिक उघड्यावर लघवी व इतर विधी करत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांसाठी शाळकरी मुलींसाठी व पुरुषांसाठी किळसवाणे प्रदर्शन निर्माण झालेले आहे महिलांना तसेच पुरुषांना येता जाता नाकाला रुमाल बांधून या परिसरातून जावे लागत आहे त्यात नागरिकांची कोणतीही चूक नाही कारण सदरील संपूर्ण परिसरात कोठेही दुसरी मुत्री किंवा शौचालय नाही नागरिकांची ही गैरसोय व नाविलाज होत आहे तरी भनपा नगरपालिकेने सदरील पडलेल्या सार्वजनिक शौचालयापाशी नागरिकांच्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी व परिसरात होणारी दुर्गंधी रोखण्यासाठी मुत्री चालू करावी किंवा शौचालय फिरतीची गाडी उभी करावी अशी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे अशी मागणी शिवसेना काकासाहेब देशमुख यांनी केली आहे अन्यथा सदरील होणाऱ्या गैरसोईमुळे भनपा नगरपालिकेवर संडास डबा आंदोलन करण्यात येईल अशी मागणी काकासाहेब देशमुख रोहित आमले प्रकाश देशमुख शरद शिरसाट दिनेश आर्य युवराज शिरसाट सचिन दुर्गुडे रमेश हेंबाडे पंकज कलंत्री संपत देशमुख मनोज कुवर राजेंद्र मुंदडा भूषण कांकरिया अनिल पमनानी जगदीश देशमुख शेखर वाईकर सुभाष जाधव सुभाष शिंदे शरद वालझाडे गौरव पाळदे रमाकांत गायकवाड अशी व्यापारी व नागरिकांनी मागणी केली आहे